ETV Bharat / sitara

कर्मचाऱ्यांना कोरोनाबाधा झाल्याने करण जोहरची आई निर्जुंतुक होतानाचा व्हिडिओ व्हायरल

author img

By

Published : May 26, 2020, 1:25 PM IST

करण जोहरची आई हिरु यांचा निर्जंतुकीकरणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यांच्या घरातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्याच इमारतीमध्ये क्वारंटाईन करुन उपचार सुरू आहेत.

Karan Johar mom Hiroo
करणची आई हिरु जोहर

मुंबई - करण जोहरच्या घरातील काम करणाऱ्या दोघांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर करणची आई हिरु जोहर या सॅनिटायझेशनच्या प्रक्रियेमधून जात असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हिरु जोहर वय ७७ या निर्जंतुक होण्यासाठी सूचनांचे पालन करताना दिसतात. हिरु जोहर आणि त्यांच्या कुटुंबातील इतर कर्मचारी यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. पुढील १४ दिवसांसाठी संपूर्ण कुटुंब सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे ते पालन करीत आहेत.

या गोष्टीची माहिती मिळतात बृहन्मुंबई महानगरपालिकेने जोहर यांची संपूर्ण बिल्डिंगचे निर्जंतुकीकरण केले असल्याचे करण जोहरच्यावतीने सांगण्यात आले.

“आमच्या घरातील दोन कर्मचाऱ्यांची कोव्हिड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्यात ही लक्षणे दिसून येताच आम्ही त्यांना वेगळे ठेवले होते. आम्ही याबद्दल बीएमसीला कळवले असता त्यांनी इमारतीचे त्यांच्या निकषांनुसार निर्जंतुकीकरण केले आहे.'', असे करण म्हणाला.

"आम्ही आजारपणाच्या वेळी त्यांना उत्तम उपचार आणि योग्य काळजी घेत आहोत. लवकरच ते पूर्ण बरे होतील. ही कठीण परिस्थिती आहे पण आमच्या घरात राहून आणि योग्य खबरदारी घेतल्यामुळे आम्ही या विषाणूचा पराभव करू शकतो, याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही. सर्वांना घरी रहा आणि सुरक्षित रहा." असेही करण पुढे म्हणाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.