ETV Bharat / sitara

वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या करणची यश आणि रुहीने घेतली मजा; पाहा व्हिडिओ - yash and roohi johar bithday news

लॉकडाऊनदरम्यान करण जोहरने यश आणि रुहीसोबत ‘लॉकडाउन विद जोहर्स’ अशी ‘इंस्टाग्राम मालिका’ सादर केली होती. ज्यात आपल्या जुळ्या मुलांचे अनेक मूड्स त्याने टिपले होते. एकंदरीत ही बाप-मुलांची नोक-झोक बऱ्याच जणांना खूप आवडली.

करण जोहर
करण जोहर
author img

By

Published : Feb 8, 2021, 10:16 AM IST

Updated : Feb 8, 2021, 10:51 AM IST

मुंबई- ‘रुही और यश का पापा, हिरु और यश का बेटा’ असे स्टेटस ठेवणाऱ्या करण जोहर ने आपल्या जुळ्या मुलांचा रुही और यशचा ४ था वाढदिवस रविवारी साजरा केला. बाहेर कितीही मानसन्मान मिळत असला तरी मुलांसमोर पालक एक व्यक्ती असतात आणि त्यांना जे जाणवते तेच ते व्यक्त होतात. कारण नेहमीच आपल्या मुलांसोबत व्हिडीओ बनवून समाज माध्यमावर पोस्ट करत असतो त्याचप्रमाणे मुलांच्या वाढदिवशीही त्याने ती प्रथा सांभाळली. रुही और यश नेहमीच आपल्या वडिलांना म्हणजेच करण जोहरला ‘ग्रील’ करताना दिसतात. ते नेहमी आपल्या वडिलांच्या कपड्यांची टिंगल उडवतात व या व्हिडीओतही त्यांनी करणला सोडलेले नाही.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या करणची यश आणि रुहीने घेतली मजा

करणच्या झगमगीत कपड्यावरुन मजा

करणने त्याच्या ‘वॉक-ईन-क्लॉझेट’मध्ये रुही और यशचे संभाषण व्हिडिओत कैद केले. ‘वॉक-ईन-क्लॉझेट’ म्हणजे असे कपाट ज्याच्या आतमध्ये तुम्ही चालत, फिरत आपल्या वस्तू शोधू शकता. एक मोठी रुम जिथे कपडे व इतर सामान संग्रहित ठेवू शकता. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या करणची त्याच्याच मुलांनी मजा घेतली. करणला झगमगीत व चकचकीत कपडे वापरण्याची सवय आहे. आणि त्याच कपड्यांबद्दल ही जुळी बहीण-भावंडं टीका करताना दिसत आहेत. सगळी मजा व्हिडिओत कैद झाली आहे.

लॉकडाऊनमध्ये मुलांसोबत मजा
यापूर्वी लॉकडाऊनदरम्यान करण जोहरने यश आणि रुहीसोबत ‘लॉकडाउन विद जोहर्स’ अशी ‘इंस्टाग्राम मालिका’ सादर केली होती. ज्यात आपल्या जुळ्या मुलांचे अनेक मूड्स त्याने टिपले होते. एकंदरीत ही बाप-मुलांची नोक-झोक बऱ्याच जणांना खूप आवडली.

Last Updated : Feb 8, 2021, 10:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.