ETV Bharat / sitara

'डिअर कॉम्रेड'च्या हिंदी रिमेकमधील स्टारकास्टबद्दल करण जोहरनं केलं ट्विट - विजय देवरकोंडा

'डिअर कॉम्रेड' चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. चित्रपटातील स्टारकास्टबद्दल चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. अनेक माध्यमांनी या चित्रपटात धडक फेम जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरची वर्णी लागल्याचे म्हटले होते.

'डिअर कॉम्रेड'च्या हिंदी रिमेकमधील स्टारकास्टबद्दल करण जोहरनं केलं ट्विट
author img

By

Published : Jul 26, 2019, 5:14 PM IST

मुंबई - विजय देवरकोंडाच्या 'अर्जुन रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या 'कबीर सिंग' चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. यानंतर आता विजयच्या 'डिअर कॉम्रेड' चित्रपटाचाही हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

करणने स्वतःच याबद्दलची माहिती दिली होती. यानंतर चित्रपटातील स्टारकास्टबद्दल चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. अनेक माध्यमांनी या चित्रपटात धडक फेम जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरची वर्णी लागल्याचे म्हटले होते. आता करणने स्वतः ट्विट करत हे वृत्त फेटाळले आहे.

Karan Johar
'डिअर कॉम्रेड'च्या हिंदी रिमेकमधील स्टारकास्टबद्दल करण जोहरनं केलं ट्विट

दाक्षिणात्य 'डिअर कॉम्रेड' चित्रपट आज प्रदर्शित झाला. करणने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. आणखी एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधील स्टारकास्ट अद्याप निश्चित झालेली नाही. या सुंदर चित्रपटाचं नियोजन सध्या सुरू आहे, असं म्हणत करणने स्टारकास्टबद्दलचे सर्व वृत्त केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.