मुंबई - एक व्हिलन चित्रपटातील जबरदस्त केमिस्ट्रीनंतर रितेश देशमुख आणि सिध्दार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. मरजावाँ या आगामी चित्रपटात त्यांचा पुन्हा एक जबरदस्त अभिनय पाहायला मिळणार असून काही वेळापूर्वीच सिनेमातील रितेश आणि सिद्धार्थचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला.
चित्रपटाच्या या थरारक पोस्टरला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत असताना निर्माता करण जोहरनं रितेश आणि सिद्धार्थचं चांगलंच कौतुक केलं आहे. करणनं दिग्दर्शक मिलाप जव्हेरी यांचं ट्विट रिट्विट करत म्हटलं, सुपर डुपर मसाला पोस्टर मिलाप, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणार आहे. द बॉईज लूक कडक...बधाई हो रितेश आणि सिद्धार्थ, असं करणनं म्हटलं आहे.
याशिवाय अनिल कपूर यांनीही किलर लूक, किलर पोस्टर...असं कॅप्शन देत रितेशचं ट्विट रिट्विट केलं आहे. 'मरजावाँ' हा चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मिलाप जव्हेरी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात रकुल प्रीत सिंग आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.