मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर करण जोहरवर सातत्याने टीका होत असते. अक्षय कुमारचा आगामी सुर्यवंशी या चित्रपटाच्या निर्मात्याच्या यादीतून करणला काढून टाकल्याची बातमी पसरली आहे. या चित्रपटाचा करण जोहर हा एक निर्माता आहे. सोशल मीडियावरुन हा दावा केला गेला की करण जोहर सुर्यवंशीचा भाग राहिलेला नाही. मात्र ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बातमी संपूर्ण खोटी आहे.
-
IMPORTANT... News doing the rounds of #KaranJohar not being part of #Sooryavanshi is untrue, clarifies #RelianceEntertainment. pic.twitter.com/0IT9qnNdyS
— taran adarsh (@taran_adarsh) July 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">IMPORTANT... News doing the rounds of #KaranJohar not being part of #Sooryavanshi is untrue, clarifies #RelianceEntertainment. pic.twitter.com/0IT9qnNdyS
— taran adarsh (@taran_adarsh) July 1, 2020IMPORTANT... News doing the rounds of #KaranJohar not being part of #Sooryavanshi is untrue, clarifies #RelianceEntertainment. pic.twitter.com/0IT9qnNdyS
— taran adarsh (@taran_adarsh) July 1, 2020
बुधवारी करण जोहरच्या बाबतीत भरपूर अफवा पसरल्या होत्या. यामध्ये त्याला सुर्यवंशी चित्रपटाचा निर्माता म्हणून रद्द करण्यात आल्याची अफवाही होती. इतकेच नाही तर त्याने या चित्रपटात केलेली इन्व्हस्टेमेंटही परत दिली गेल्याचे व्हायरल झाले होते. आता याबाबतचे सत्य उघड झाले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी टविट करुन ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; संजय लीला भन्साळींची होणार चौकशी
सुर्यवंशी हा चित्रपट रिलायन्स एन्टरटेन्मेंट आणि धर्मा प्रॉडक्शन यांची संयुक्त निर्मिती आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमाणामुळे याचे रिलीज पुढे ढकलण्यात आले होते. आता हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार हे स्पष्ट झाले आहे. सुर्यवंशम हा चित्रपट रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला असून यात रणवीर सिंग, अजय देवगणसह कॅटरिना कैफचीही महत्त्वाची भूमिका आहे.