मुंबई - अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा आपल्या हट्टावर कायम आहे. बॉलिवूड नेपोटिझ्मवर भाष्य करण्याची एकही संधी ती सोडत नाही. नुकतेच करिना कपूरने यावर आपले मत मांडले होते. याला कंगनाच्या टीमने प्रत्युत्तर दिले आहे. करिनाचे यश अपात्र असल्याचे कंगनाच्या टीमने म्हटले आहे.
ट्विटची मालिका चालवत कंगनाच्या टीमने करिना आणि स्टार किड्सवर निशाणा साधलाय. "होय करीना, प्रेक्षकांनी तुम्हा सर्वांना श्रीमंत आणि प्रसिद्ध केले आहे. परंतु, त्यांना यश मिळाल्यानंतर माहित नव्हते की तुम्ही सर्वजण बॉलिवूडमधून बुलीवूडमध्ये प्रवेश कराल, कृपया स्पष्टीकरण द्या १) आपल्या सर्वात चांगल्या मित्राने कंगनाला उद्योग सोडण्यास का सांगितले? २) सुशांतवर मोठ्या प्रॉडक्शन हाऊसकडून बंदी का घालण्यात आली होती? ३) त्यांनी कंगनाला जादूगार आणि सुशांतला बलात्कारी का म्हटले? ४) आपल्या इकोसिस्टिमने कंगना व सुशांत यांना दोन टोकांचे का संबोधले? ५) कंगना आणि सुशांतला इंडस्ट्रीमध्ये एकटे का पाडले आणि त्यांना कधी कुठल्याही पार्टीला का बोलावले नाही? त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा चित्रपटाला यश मिळाल्यानंतर त्यांना कोणीही शुभेच्छा का दिल्या नाहीत? "
कंगनाच्या टीमने 'नेपो किड्स'लाही हा विषय खोडून काढणे थांबवा, असा इशारा दिला आहे. “सर्व मुक्या नेपो मुलांना इशारा, प्रयत्न करु नका आणि या विषयातून बाहेर पडा, आम्हाला तुमच्या विशेषाधिकारांबद्दल कोणतीही अडचण नाही, आमची समस्या ही आहे की आमच्याशी तुम्ही कसे वागत आहेत. सुशांतचा खून तुमच्या गुंडगिरीने आणि सामूहिक बलात्काराने झाला आहे, अशी त्यांनी तक्रार केली. फिल्म इंडस्ट्रीबद्दल त्याचा दम घुटला आहे आणि तो सोडून द्यायचा आहे. याबद्दल तो ओरडला की तुम्ही सर्वांनी त्याला बलात्कारी म्हटले आहे आणि त्याच्या कामाचे श्रेय तुम्ही कधीच दिले नाही, आपल्याकडे किती चित्रपट किंवा ड्रेस आहेत हा सध्या चर्चेचा विषय नाही, कृपया या मुद्द्यांवर बोला."
विचित्र वाटेल पण मलाही संघर्ष करावा लागला - करिना कपूर
हेही वाचा -
यापूर्वी करिनाने एका अग्रगण्य पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, फक्त नेपोटिझ्ममुळे ती दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये टिकू शकलेली नाही, तिलाही संघर्ष करावा लागलाय.
"प्रेक्षकांनी आम्हाला बनवलं आहे, इतर कुणीही बनवलं नाही. तेच लोक बोट दाखवून इशारा करीत आहेत, ते केवळ नातलगवादी स्टार्सना बनवत आहेत. आप जा रहे हो ना फिल्म देखणे? मत जाओ. कोणीही तुमच्यावर जबरदस्ती करीत नाही. त्यामुळे मला हे समजत नाही. मला ही संपूर्ण चर्चा विचित्र वाटते,'' असे करिना म्हणाली.
"आज आपण निवडलेल्या आमच्या अनेक बड्या अभिनेत्यांमध्ये, अक्षय कुमार असोत किंवा शाहरुख खान असोत की ,आयुष्मान खुराना असो की राजकुमार राव, हे सर्व बाहेरचे लोक आहेत. ते यशस्वी अभिनेते आहेत. कारण त्यांनी कष्ट केले आहे. आम्ही देखील खूप मेहनत केली आहे. आलिया भट्ट असो की करिना कपूर, आम्ही देखील खूप परिश्रम घेतले आहेत. तुम्ही आम्हाला पाहता आणि आमचे चित्रपट एन्जॉय करता. त्यामुळे प्रेक्षकच आम्हाला घडवू शकतात किंवा रोखू शकतात.'', असे ती पुढे म्हणाली.