ETV Bharat / sitara

"देशद्रोहीच देश चालवणार आहेत का?" ट्विटर बंदीनंतर कंगनाचा सवाल..

कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. कंगनाने मायक्रो-ब्लॉगिंग साइटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर हे खाते निलंबित केले गेले आहे. ट्विटर अकाउंट बंद केल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Kangana Ranaut
कंगना रणौत
author img

By

Published : May 4, 2021, 5:18 PM IST

Updated : May 4, 2021, 6:00 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिला एक ट्विटर पोस्ट महागात पडली आहे. तिने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचारावर भाष्य करणारीएक वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. यात तिने ममता बॅनर्जी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाईटवरील तिचे खाते आता निलंबीत करण्यात आले आहे. ट्विटर अकाउंट बंद केल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओमध्ये कंगनाने पश्चिम बंगालमधील राष्ट्रपती राजवट देण्याची शिफारस केली आहे. राज्यात निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हाभरात हिंसाचार वाढला आहे. याकडे आंतरराष्ट्रीय मीडियाचे लक्ष नाही. देशद्रोहीच देश चालवणार आहेत का? असा सवालही कंगनाने या व्हिडिओतून विचारला आहे. यापूर्वीच्या पंतप्रधानांनी राष्ट्रपती राजवट लागू केली होती तर मग आता बंगालमध्ये लागू करायला काय हरकत आहे असेही कंगनाने म्हटलंय.

कंगना रणौतची व्हिडिओ पोस्ट

यापूर्वी आज कंगना रणौतचे ट्विटर अकाउंट वादग्रस्त ट्विटची मालिका चालवल्यामुळे निलंबीत करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल मंगळवारी कंगनाने काही पोस्टची मालिकाच चालवली होती. त्यानंतर ट्विचरने तिचे अकाउंट कायमचे बंद केले आहे.

kangana ranaut twitter handle suspended
कंगनाचे ट्विटर कायमचे बंद

कंगनाने यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त ट्विटकेली होती. जानेवारीमध्ये तांडव या वेब सिरीजबद्दल असेच वादग्रस्त ट्विट केल्यानंतर तिच्या ट्विटर अकाऊंटवर बालंट आले होते. त्यानंतर शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त टिपणी केल्यानंतरही कंगनाला त्याचा फटका बसला होता.

हेही वाचा - बुध्दीजीवी लोक भारताची प्रतिमा खराब करीत आहेत - कंगना रणौत

Last Updated : May 4, 2021, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.