मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतचे ट्विटर हँडल बंद करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्रींनी ट्वीटच्या करत आक्षेपार्ह भाष्य केले होते.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.अभिनेत्री कंगना रणौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत बहुतेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्ट आणि ट्वीटवरून वादात राहिली आहे. सामाजिक आणि राजकीय प्रत्येक विषयावर कंगना उघडपणे आपले मत व्यक्त करताना दिसते. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले आहे. ज्यानंतर कंगना टीएमसीविरोधात अनेक प्रकारचे ट्विट करत होती.
सोशल मीडियावर कंगना अनेकदा भाजपा आणि पंतप्रधानांच्या समर्थनार्थ दिसली. अशा परिस्थितीत आता पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रकारे हिंसाचार घडत आहेत त्यावर कंगनाने टीएमसीला लक्ष्य केले आहे. कंगनाने नुकतेच एक धक्कादायक ट्विट देखील केले होते.
कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 'मी चूक होते, ती रावण नाही. रावण तर सर्वोत्कृष्ट राजा होता, त्याने जगातला सर्वोत्कृष्ट देश बनवला, एक महान प्रशासक, अभ्यासक आणि वीणावादक होता आणि आपल्या प्रजेचा राजा होता. ती एक रक्तपात करणारी राक्षस आहे. ज्या लोकांनी त्यांना मतदान केले आहे, त्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत.'