मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या आगामी 'थलायवी' या चित्रपटातील सध्याच्या सत्रातील काम पूर्ण केले आहे. या चित्रपटातील नवा लुक कंगनाने तिच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या मोनोक्रोम (एकरंगी/ब्लॅक अॅण्ड व्हाईट) चित्रात कंगना साडीमध्ये दिसली आहे. तिने केसांचीही साधी वेणी घालून ती पाठीमागे सोडली आहे.
'जया माँच्या आशीर्वादाने आम्ही थलायवी - क्रांतिकारक नेत्या या चित्रपटातील आणखी एक सत्र पूर्ण केले. कोरोनानंतर बर्याच बाबी बदलल्या आहेत. मात्र, अभिनय करताना आणि 'कट' म्हणण्यापूर्वी काहीही बदलेले नाही. धन्यवाद टीम,' असे तिने लिहिले आहे.
-
With the blessings of Jaya Ma we completed one more schedule of Thalaivi- the revolutionary leader. After corona many things are different but between action and before cut nothing changes. Thank you team @vishinduri @ShaaileshRSingh #ALVijay pic.twitter.com/CghmfK0JQf
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">With the blessings of Jaya Ma we completed one more schedule of Thalaivi- the revolutionary leader. After corona many things are different but between action and before cut nothing changes. Thank you team @vishinduri @ShaaileshRSingh #ALVijay pic.twitter.com/CghmfK0JQf
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 11, 2020With the blessings of Jaya Ma we completed one more schedule of Thalaivi- the revolutionary leader. After corona many things are different but between action and before cut nothing changes. Thank you team @vishinduri @ShaaileshRSingh #ALVijay pic.twitter.com/CghmfK0JQf
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 11, 2020
हेही वाचा - अमिताभ बच्चन यांचा आज ७८ वा वाढदिवस; साधेपणाने करणार साजरा
'थलायवी' हा तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा बायोपिक आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होईल. ए. एल. विजय या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
या चित्रपटातील भूमिकेसाठी कंगनाने जवळपास 20 किलो वजन वाढवले आहे. लॉकडाउनदरम्यान, तिने अतिरिक्त वजन वाढवण्यासाठी तिच्या वैयक्तिक प्रशिक्षकाची मदत घेतली.
लॉकडाउन झाल्यापासून कंगना मनालीमध्ये आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत होती. यादरम्यान काही दिवस ती मुंबईत होती. त्यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तिच्या येथील घरात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा दावा करत तिच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.
हेही वाचा - 'पीएम नरेंद्र मोदी'च ठरणार लॉकडाऊन नंतर थिएटर्समध्ये रिलीज होणारा पहिला सिनेमा