ETV Bharat / sitara

नवा वाद : कंगना रणौतचा आमीर खानवर निशाणा

author img

By

Published : Oct 24, 2020, 12:53 PM IST

कंगना रणौतने आपली जेलमध्ये जाण्याची तयारी असल्याचे सांगत असहिष्णुतेचा मुद्दा उकरुन काढला आणि आमीर खानवर निशाणा साधला आहे. तिच्या या नव्या ट्विटने ती पुन्हा चर्चेत आली आहे.

Kangana Ranaut
कंगना रणौत

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतवर मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर ती बेछूट विधाने करीत सुटली आहे. तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असून तिच्या नावे समन्सही जारी करण्यात आले आहेत. कंगनाने आपली जेलमध्ये जाण्याची तयारी असल्याचे सांगत असहिष्णुतेचा मुद्दा उकरून काढला आणि आमीर खानवर निशाणा साधला आहे.

  • I worship people like Savarkar, Neta Bose and Rani of Jhansi. Today the government trying to put me in jail that makes me feel confident of my choices, waiting to be in jail soon n go through same miseries my idols were subjected to, it will give a meaning to my life, Jai Hind 🙏

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) October 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तिने ट्विटमध्ये लिहिलंय, ''मी सावरकर, नेताजी बोस आणि झाशीच्या राणीची पूजा करते. आज सरकार मला जेलमध्ये टाकू पाहतेय, ज्यामुळे मला माझ्या निवडीबद्दल विश्वासू वाटत आहे. जेलमध्ये जाण्याची आणि माझ्या आदर्शांसारखे कठीण प्रसंग सहन करण्याची मी प्रतीक्षा करीत आहे. यामुळे माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल. जय हिंद.''

आमीरचे मौन, कंगनाचा निशाणा

या प्रकरणात मौन बाळगल्याबद्दल कंगनाने आमीर खानवरही दुसऱ्या एका ट्विटमधून निशाणा साधलाय.

  • जैसे रानी लक्ष्मीबाई का क़िला तोड़ा था मेरा घर तोड़ दिया, जैसे सावरकर जी को विद्रोह केलिए जेल में डाला गया था मुझे भी जेल भेजने की पूरी कोशिश की जा रही है, इंटॉलरन्स गँग से जाके कोई पूछे कितने कष्ट सहे हैं उन्होंने ने इस इंटॉलरंट देश में? @aamir_khan

कंगनाने आमीर खानला टॅग करीत ट्विट केलंय, "जसा राणी लक्ष्मीबाईंचा किल्ला तोडला होता, तसे माझे घर फोडून टाकले, ज्याप्रमाणे सावरकरजींना बंडखोरीसाठी तुरुंगात टाकले गेले होते, तसेच ते मला तुरुंगात पाठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. असहिष्णूता गँगला जाऊन विचारले पाहिजे की, त्यांनी या असहिष्णू देशात किती दु: ख भोगले?"

खरंतर २०१५मध्ये आमीर खानने असहिष्णूतेच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. तो म्हणाला होता की, आपली पत्नी किरण रावला हा देश सोडावा असे वाटते. तिला मुलांची चिंता वाटत असल्यामुळे ती असे बोलल्याचे आमीर म्हणाला होता.

कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात जातीय द्वेष पसरवल्याचा आरोप करणारी तक्रार मुनावर अली साहिल यांनी दाखल केली आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.