मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतने बुधवारी सकाळी तिच्या मेक्सिको प्रवासातील एक थ्रोबॅक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. समुद्राच्या काठावर वाळूत पाठमोरी बसलेली कंगना यात दिसते. चाहत्यांनी यावर भरपूर प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे.
या फोटोत कंगनाने गुलाबी आणि निळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. मेक्सिकोच्या तुलुम बेटावर ती सुट्टीचा आनंद घेत असतानाचा हा थ्रोबॅक फोटो आहे.
![Kangana Ranaut](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9976368_kangana.jpg)
“गुड मॉर्निंग मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात भेट दिलेल्या सर्वात रोमांचक जागांपैकी एक म्हणजे मेक्सिको, सुंदर परंतु एक अकल्पित ठिकाण नाही, मेक्सिकोमधील हे छोटे बेट तुळमचा एक फोटो आहे,” असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
हेही वाचा - कुठे आणि कधी होणार सलमान-कॅटरिनाच्या 'टायगर ३' चे शुटिंग
कामाचा विचार करता कंगनाने 'थलायवी'चे शूटिंग संपवले असून हा चित्रपट दिवंगत जयललिता यांचा द्विभाषिक बायोपिक आहे. या बायोपिकचे दिग्दर्शन ए.एल. विजय यांनी केले असून यात अरविंद स्वामी, प्रकाश राज, मधु आणि भाग्यश्री यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचा - आयुष्यमान-वाणीने ४८ दिवसात आटोपले 'चंडीगड करे आशिकी'चे शुटिंग