मुंबई - प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीनंतर आज अभिनेत्री तापसी पन्नूने ट्विट करून खुलासा केला. त्यावर आता अभिनेत्री कंगना राणावतने ट्विट करून तिच्यावर टीका केली आहे. तू हमेशा सस्ती रहेगी, असे कंगना तिला म्हणाली.
तू नेहमीच अशी 'सस्ती' राहणार कारण तुम्ही सर्व बलात्कारी व्यक्तीच्या स्त्रीवादी आहात. तुमचा जो रिंगमास्टर आहे कश्यप त्याच्यावर 2013 मध्ये कर चोरी प्रकरणी छापा पडला होता. यावर सरकारची पुढील अहवाल समोर आला आहे. तरीही तुला अजून लाज वाटत नसेल तर त्यांच्याविरुद्द न्यायालयात जा आणि संपूर्ण माहिती घेऊन ये, कमॉन सस्ती, असे ट्विट कंगनाने केले आहे.
अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. विभागाने मुंबई, पुणे, दिल्ली आणि हैदराबाद येथे शोधमोहीम राबविली. शुक्रवारी रात्री पुण्यात तापसी आणि अनुराग यांची अधिकाऱ्यांनी चौकशी केली. या संपूर्ण प्रकरणात पहिल्यांदाच अभिनेत्री तापसी पन्नूने मौन सोडत सकाळी ट्विट केले.
तापसीने काय म्हटले आहे ट्विटमध्ये
तापसी पन्नूने सलग तीन टि्वट केली आहेत. पहिल्या टि्वटमध्ये तापसीने म्हटले, की आतापर्यंत मुख्यत: तीन गोष्टींवर सखोल चौकशी करण्यात आलीय. पॅरिसमध्ये असलेल्या तथाकथित बंगल्याची चावी माझ्याकडे असून तो माझ्या मालकीचा आहे. त्या बंगल्यावर मी उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवते, असा दावा करण्यात येतोय. मात्र, आपल्या नावावर कोणताही बंगला नसल्याचे तीने सांगितले.
तर दुसऱ्या टि्वटमध्ये तापसीने पाच कोटींच्या कथित पावतीवर प्रकाश टाकला. पाच कोटीची पावती माझ्याकडे असून ते पैसे मी भविष्यासाठी ठेवले आहेत, असे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मात्र, पाच कोटींची कोणतीही पावती आपल्याजवळ नसल्याचे तीने म्हटलं.
माननीय अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 2013 मध्ये माझ्या घरी छापे पडले होते. मात्र, तसे नाही, असे तिने तिसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे. याचबरोबर नॉट सो सस्ती एनीमोर (आता अजून स्वस्त नाही) असेही तिने म्हटले आहे. 'स्वस्त कॉपी' असा तापसीचा उल्लेख कंगनाने अनेकदा केला आहे. आज पुन्हा कंगनाने तापसी आणि अनुराग कश्यप यांच्यावर ट्विट करून टीका केली.