मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत 'थलायवी' चित्रपटाच्या शुटिंगनंतर 'धाकड' या चित्रपटात काम करीत आहे. त्याचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. पण शूटिंगच्या अगोदर अभिनेत्रीने आता चित्रपटाचे दिग्दर्शक रझ्झी घई यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन घई यांचे कौतुक केले आहे. पण या फोटोत अर्जुन रामपाल असल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.
राझी घई हा भारताचा टॉप एड फिल्म निर्माता
कंगना रणौतने आपल्या ट्विटर अकाऊंटवर 'धाकड'च्या टीमबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक राझी घई उपस्थित आहेत आणि ट्विटच्या कॅप्शनमध्ये कंगनानेही दिग्दर्शकाची जोरदार प्रशंसा केली आहे. दिग्दर्शक राझी घई हा भारताचा टॉप एड फिल्म निर्माता असून 'धाकड' हा त्यांचा दिग्दर्शिन करीत असलेला पहिला चित्रपट आहे.
हेही वाचा - २०२० विचित्र होते, २०२१ साठी कोणताही संकल्प नाही - अमिताभ बच्चन
या चित्रपटात कंगना रणौत पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. यापूर्वी अशा भूमिकांमध्ये ती कधी दिसली नव्हती. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कंगना महिला जासूसच्या भूमिकेत असेल. या चित्रपटात कंगना प्रथमच कृत्रिम मेकअप देखील वापरणार आहे. कंगनाने गेल्या आठवड्यातच या माहितीबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. मनाली येथील तिच्या घरातून तिने चेहऱयावर मेकअप करातानाचे काही फोटो शेअर केले होते.
हेही वाचा - 'एनिवन' व्हिडिओसाठी जस्टीन बीबरने 'काढले' शरीरावरील 'टॅटू'!!