मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनप्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सोशल मीडियावर मोहिम चालवली जात आहे. यात कंगना रनौत सहभागी झाली आहे. तिनेही आम्ही सत्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
-
Mumbai police wants to rush the probe, Sanjay Raut saying they are almost done with the investigation, we deserve to know the truth #CBIForSSR @republic #justiceforSushanthSinghRajput @shwetasinghkirt @anky1912 pic.twitter.com/2SV1AwaFx7
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) August 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai police wants to rush the probe, Sanjay Raut saying they are almost done with the investigation, we deserve to know the truth #CBIForSSR @republic #justiceforSushanthSinghRajput @shwetasinghkirt @anky1912 pic.twitter.com/2SV1AwaFx7
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) August 13, 2020Mumbai police wants to rush the probe, Sanjay Raut saying they are almost done with the investigation, we deserve to know the truth #CBIForSSR @republic #justiceforSushanthSinghRajput @shwetasinghkirt @anky1912 pic.twitter.com/2SV1AwaFx7
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) August 13, 2020
कंगनाच्या टीमने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती सीबीआय चौकशी होऊन सत्य समोर यावे अशी मागणी करताना दिसते. "आम्हाला सुशांतसिंह राजपूतसाठी सीबीआय (चौकशी) हवी आहे. आम्ही सत्य जाणून घेण्यास पात्र आहोत," असे कंगनाने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सुशांतच्या मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करण्यासाठी कंगना सुरूवातीपासून आवाज उठवताना दिसत आहे.
५ ऑगस्ट रोजी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की सुशांतसिंग राजपूतचे मृत्यू प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची बिहार पोलिसांची शिफारस त्यांनी स्वीकारली आहे. यानंतर हा खटला सीबीआयच्या अखत्यारीत आला आहे, पण तरीही महाराष्ट्रात या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देईल.
हेही वाचा - सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी अंकिता आणि कृती सेनॉनने केली मागणी
आज यापूर्वी श्वेता सिंगने तिच्या भावाच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत आपला व्हिडिओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने लिहिले, "सीबीआय चौकशीसाठी आम्ही एक राष्ट्र म्हणून एकत्र उभे आहोत. निःपक्षपाती चौकशीची मागणी करणे हा आमचा हक्क आहे आणि सत्य समोर येण्याशिवाय आम्हाला आणखी काहीच अपेक्षीत नाही.
राजपूत 14 जून रोजी त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला होता.