ETV Bharat / sitara

कंगनाचा आता आयुष्मान खुराणावर निशाणा, म्हणते 'चापलूस आऊटसाइडर्स' - बॉलिवूडमधील नेपोटिझ्म

सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर नेपोटिझ्मच्या वादात तापसी पन्नू, आलिया भट्ट, स्वरा भास्कर यांच्यावर अनेक आरोप केल्यानंतर कंगना रनौत हिने आता आयुष्मान खुराणावर निशाणा साधला आहे. आयुष्मानने रिया चक्रवर्तीच्या बाजूने विधान केले होते. त्यानंतर कंगनाने त्याला 'चापलूस आऊटसाइडर्स' म्हटले आहे.

Kangana now targets Ayushman Khurana
कंगनाचा आता आयुष्मान खुराणावर निशाणा
author img

By

Published : Aug 10, 2020, 3:57 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रनौत बिनधास्त बोलण्यामुळे नेहमी चर्चेत असते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ती बरीच आक्रमकपणे बोलत असते. बॉलिवूडमधील नेपोटिझ्म मुद्द्यावर तिने आतापर्यंत बऱ्याच गोष्टी बोलल्या आहेत.

सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील इनसायडर विरुद्ध आऊटसायडर्स असा वाद सुरू आहे. स्टार किड्स, चित्रपट उद्योगातील प्रस्थापित घराणी आणि तिथले कलाकार हे इनसायडर समजले जातात आणि ज्यांना चित्रपट व्यवसायाची पार्श्वभूमी नाही किंवा जे या उद्योगात येण्यासाठी ज्यांनी संघर्ष केलाय त्यांना आऊटसायडर्स समजले जाते. स्टार किंड्स किंवा इनसायडर कलाकारांबद्दल सहानुभूमी ठेवणाऱ्या प्रत्येकावर कंगना निशाणा साधत असते. अलिकडेच आयुष्मान खुराणाने रिया चक्रवर्तीची बाजू घेणारे वक्तव्य केले होते. आता त्याच्यावर कंगना भडकली आहे.

हेही वाचा - सुशांतच्या मृत्यूनंतर कंपनीच्या आयपी अॅड्रेसमध्ये दोनदा बदल

आयुष्मानवर टीका करताना कंगनाने त्याला 'चापलूस आऊटसाइडर्स' म्हटले आहे. सुशांतच्या निधनानंतर कंगना लोकांवर सातत्याने नेपोटिझ्म आणि ग्रुपिझमचा आरोप करीत असते. आता तिने आऊटसायडर्सवरही टीका करायला सुरूवात केली आहे. आतापर्यंत कंगनाने दिनों महेश भट्ट, करण जोहर, सलमान खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक कलाकारांवर टीका केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.