पणजी - गेल्या आठवड्यात गोवा येथील गावात शूटसाठी आलेल्या करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या कर्मचाऱ्याने पीपीई किट आणि इतर कचरा वेगळा न करता फेकून दिल्याचा आरोप होत आहे. अशाप्रकारे निष्काळजीपणाने कचरा टाकल्यास पर्यावरणाचे नुकसान होते, असा दावा करत कंगना रणौतने करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसवर केला होता. याबद्दलचे ट्विट तिने केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांनाही टॅग केले होते. याबाबत धर्मा प्रॉडक्शनने ज्याच्यावर लाइन प्रोड्युसर म्हणून दिलीप बोरकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. बोरकर यांनी कंगनाचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. कंगनाला वास्तव माहिती नसल्याचे बोरकर म्हणाले.
बोरकर यांनी बुधवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, "कंगना रणौत हिला याबद्दल काहीही माहिती नाही. ती गोव्याचे नाव खराब करीत आहे. ती आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण यात करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शनच्या नावाचा यात समावेश आहे.''
-
Their insensitive and inconsiderate attitude is absolutely appalling,film units need strict rules about women safety, modern ecological resolves, good medical facilities and food quality check for workers, we need government to assign a proper department to inspect these aspects. pic.twitter.com/B4ec6sHzNK
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Their insensitive and inconsiderate attitude is absolutely appalling,film units need strict rules about women safety, modern ecological resolves, good medical facilities and food quality check for workers, we need government to assign a proper department to inspect these aspects. pic.twitter.com/B4ec6sHzNK
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 27, 2020Their insensitive and inconsiderate attitude is absolutely appalling,film units need strict rules about women safety, modern ecological resolves, good medical facilities and food quality check for workers, we need government to assign a proper department to inspect these aspects. pic.twitter.com/B4ec6sHzNK
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 27, 2020
फिल्म प्रॉडक्शनच्या क्रूच्या कचर्याचा ढिग असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर या वादाला तोंड फुटले. यानंतर शूटिंगशी संबंधीत नियमांची देखरेख करणारी सरकारी एजन्सी एंटरटेनमेंट सोसाइटी ऑफ गोवा (ईएसजी)ने बोरकर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. नॉन-बायोडेग्रेडेबल कचरा टाकताना निकष पाळले गेले नसल्याचे या नोटिशीत नमूद केले आहे. या कचर्यामध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वापरल्या जाणार्या पीपीई किट्सचादेखील समावेश होता.
बोरकर म्हणाले की, दीपिका पादुकोणची भूमिका असलेल्या धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटाचे उत्तर गोव्यातील नेरुळच्या समुद्र किनाऱ्यावरील खेड्यात व्हिला येथे चित्रित केले जात होते आणि स्थानिक ग्रामपंचायतीने सांगितलेल्या जागेवर दररोज कचरा टाकला जात होता.
बोरकर म्हणाले, "ग्रामपंचायतीने नेमलेला स्थानिक ठेकेदार दररोज हा कचरा टाकत असे. फक्त रविवारीच तो हे करू शकला नाही, ज्याचे फोटो व्हायरल झाले," मंगळवारी कंगना रणौतने ट्विटरवर हे फोटो अपलोड केले आणि त्यानंतर वाद सुरू झाला आणि फोटो व्हायरल झाले.