मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये तिचे माजी कथित प्रियकर हृतिक रोशन आणि आदित्य पंचोली यांचा 'दयाळू आत्मा' असा उल्लेख केला आहे. महाराष्ट्र शासनाबाबत नुकत्याच झालेल्या अनुभवाचे वर्णन करीत कंगनाने या दोन्ही कलाकारांची नावे घेतली आहेत.
कंगनाने शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय, "गेल्या काही महिन्यापसून माझ्यावर अनेक कायदेशीर खटले, छळ, अपमान असा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून होत असताना बॉलिवूड माफिया आणि आदित्या पांचोली आणि ह्रतिक रोशनसारखे लोक मात्र त्यांना दयाळू लोकांसारखे दिसत आहेत ....मला आश्चर्य आहे की माझ्यामध्ये असे काय आहे ज्यामुळे या लोकांना इतका त्रास होतो. "
हेही वाचा - "लॉ ऑफ लव्ह" ९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात येण्यासाठी सज्ज
बीएमसीच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रतिसाद म्हणून कंगनाचे हे ट्विट आले. वास्तविक, मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी कंगना रणौतचा बंगला पाडण्याच्या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) फटकारले होते. त्यानंतर कंगनाने एक व्हिडिओ पोस्ट करीत हा आपला विजय असल्याचे म्हटले होते. त्यानंतर महपौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर तिने हे ट्विट करुन पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा - मनीष पॉलने सुरू केले 'जुग जुग जियो'चे शूटिंग