मुंबई - अभिनेत्री काजोल आगामी 'तान्हाजी - द अनसंग वारियर' या चित्रपटात सावित्रीबाई मालुसरे ही व्यक्तीरेखा साकारत आहे. तिचा या चित्रपटातील लूक एका पोस्टरद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे.
'तान्हाजी - द अनसंग वारियर' हा चित्रपट १० जानेवारी २०१० ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या रिलीज केला जाणार आहे.
या चित्रपटात काजोलचा पती अजय देवगण हा तान्हाजी मालुसरेंचे मुख्य व्यक्तीरेखा साकारणार आहे. हा एक शिवकालिन ऐतिहासिक विषयावरचा चित्रपट आहे. कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी तान्हाजी मालुसरे यांनी स्वतःचे प्राण पणाला लावून केलेल्या लढाईची ही गाथा मोठ्या पडद्यावर हिंदीत पाहायला मिळणार आहे.