मुंबई - कबीर सिंग या शाहिद कपूरच्या आगामी सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. यातील 'कैसे हुआ' हे गाणे रिलीज झाले आहे. यात कबीर सिंग आणि प्रिती यांच्या प्रेमात पडण्याचा प्रसंग चित्रीत झाला आहे.
'कैसे हुआ' गाणे सोशल मीडियावर शाहिद कपूरने शेअर केले आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ''वॉच कबीर और प्रिती को प्यार कैसे हुआ.''
'कैसे हुआ' हे गाणे मनोज मुंताशीर यांनी लिहिलेले आहे. हे गाणे विशाल मिश्रा यांनी गायले असून त्यांनीच याला संगीतबध्दही केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'कबीर सिंग' हा चित्रपट तेलुगुमधील सुपरहिट ठरलेल्या 'अर्जुन रेड्डी'चा हिंदी रिमेक आहे. २१ जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे.