ETV Bharat / sitara

हंसल मेहतांसाठी 'छलांग'च्या मेकिंगचा प्रवास खूपच रंजक - राजकुमार राव

'छलांग' हा क्रीडा शिक्षकावरचा चित्रपट असल्याने प्रत्येकाच्या अनुभवातील प्रसंग यात आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सांगितला आहे.

Chhalang'
छलांग
author img

By

Published : Nov 2, 2020, 6:51 PM IST

मुंबई - अमेझॉन प्राइम व्हिडीओवरील आगामी 'छलांग' या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे. या चित्रपटाची कथा शाळेतील क्रीडा शिक्षकाची असल्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात अनुभवलेले प्रसंग चित्रपट पाहताना डोळ्यासमोर उभे राहणार आहेत.

दिग्दर्शक हंसल मेहता या चित्रपटाच्या संकल्पनेविषयी म्हणाले, "छलांग हा माझ्या चित्रपटाच्या प्रवासाचा एक अतिशय रोमांचक भाग आहे. कारण माझ्यासाठी चित्रपट निर्मितीचे हे २०वे वर्ष आहे आणि जेव्हा आम्ही असा चित्रपट बनवत आहोत तर माझ्या २०व्या वर्षापेक्षा अधिक चांगली वेळ दुसरी कुठली असणार आहे? लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी दिवाळीहून जास्त चांगला काळ असूच शकत नाही.''

ते म्हणाले, "हा एक भक्कम संदेश असलेला चित्रपट आहे, जो करमणुकीच्या माध्यमातून स्वीकारणे सोपे आहे. सुंदर अभिनेत्री नुसरत आणि माझा आवडता राजकुमार राव यांच्यासहीत उत्तम स्टारकास्ट यात आहे. याची कथा लव रंजनने लिहिली आहे.''

दिग्दर्शकाने नमूद केले की, 'हा एक आश्चर्यकारक मनोरंजक चित्रपट आहे, राजकुमार बरोबर हा माझा ६ वा चित्रपट आहे, यात तो मरत नाही, तुरुंगातही जात नाही आणि हा एक असा चित्रपट आहे जिथे शेवटी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल आणि तुमचे डोळेही पाणवलेले असतील."

हंसल मेहता दिग्दर्शित हा चित्रपट लव्ह फिल्म्स प्रॉडक्शनचा असून गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांनी प्रस्तुत केलेला आहे. अजय देवगण, लव रंजन, अंकुर गर्ग निर्मित या चित्रपटात अष्टपैलू अभिनेते राजकुमार राव आणि नुसरत भरुचा यांच्यासह सौरभ शुक्ला, सतीश कौशिक, झीशान अयूब, इला अरुण आणि जतिन सरना मुख्य भूमिकेत आहेत.

हा चित्रपट १३ नोव्हेंबरला अमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.