ETV Bharat / sitara

‘सत्यमेव जयते २’च्या ‘तेनू लेहेंगा' या गाण्यावर थिरकले दोन जॉन अब्राहम आणि एक दिव्या खोसला कुमार!

‘सत्यमेव जयते’ (Satyamev Jayate) च्या अभूतपूर्व यशानंतर जॉन अब्राहम (John Abraham) त्याचा सिक्वेल ‘सत्यमेव जयते २’ (Satyamev Jayate-2)घेऊन येत आहे. नुकतेच या बहुप्रतिक्षित ऍक्शन चित्रपटातील 'तेनू लेहेंगा' हे गाणे समाज माध्यमांवर प्रदर्शित केले गेले. लोकप्रिय पंजाबी म्युझिक सेन्सेशन जस मानक यांच्या 'लेहेंगा' या लोकप्रिय गाण्यावर हे गीत बनले असून यात जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) तन्मयतेने नाचताना दिसत आहेत.

author img

By

Published : Nov 16, 2021, 3:23 PM IST

‘सत्यमेव जयते’ (Satyamev Jayate)
‘सत्यमेव जयते’ (Satyamev Jayate)

‘सत्यमेव जयते’ (Satyamev Jayate) च्या अभूतपूर्व यशानंतर जॉन अब्राहम (John Abraham) त्याचा सिक्वेल ‘सत्यमेव जयते २’ (Satyamev Jayate-2)घेऊन येत आहे. नुकतेच या बहुप्रतिक्षित ऍक्शन चित्रपटातील 'तेनू लेहेंगा' (Tenu lehenga) हे गाणे समाज माध्यमांवर प्रदर्शित केले गेले. लोकप्रिय पंजाबी म्युझिक सेन्सेशन जस मानक यांच्या 'लेहेंगा' या लोकप्रिय गाण्यावर हे गीत बनले असून यात जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) तन्मयतेने नाचताना दिसत आहेत.

महत्वाचं म्हणजे दिव्या खोसला कुमारसोबत जॉन अब्राहमच्या दोन्ही व्यक्तिरेखा थिरकताना दिसताहेत. हे गाणे प्रेक्षकांना नाच करण्यासाठी उद्युक्त करणारे आहे हे नक्की. ‘लेहेंगा’ हे मूळ गाणे जस मानक यांनी लिहिले असून संगीतही त्यांनी दिले आहे दिले आणि गायले सुद्धा आहे. असे असले तरी संगीतकार तनिष्क बागची (Musician Tanishq Bagchi) यांनी ते नवीन पद्धतीने तयार केले असून आणि जस मानक आणि झारा खान यांनी ते गायले आहे.

या गाण्याबद्दल सांगताना जॉन अब्राहम म्हणाला, 'पार्टी आणि लग्नांमध्ये लेहंगाची क्रेझ असते. जस मानक हे संगीत क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. मला त्याच्या आणि दिव्यासोबत इतक्या दिवसांनी डान्स करताना खूप मजा आली, तीही दुहेरी भूमिकेत. तो एक वेगळा अनुभव होता."

दिव्या खोसला कुमार म्हणाली, “जेव्हा लेहेंगा गाणे रिलीज झाले, तेव्हा ते फार कमी वेळात खूप प्रसिद्ध झाले. आता तेनू लेहेंगा नक्कीच प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरे उतरेल आणि सोने पे सुहागा या गाण्याचा एक भाग आहे. जॉन आणि मी शूट केलेला व्हिडिओ खूप उत्तम रीतीने जमून आलेला आहे आणि तो लग्नाच्या हंगामासाठी योग्य ‘आयटम सॉंग’ ठरेल."

गायक, संगीतकार जस मानक उत्साहाने म्हणाले, “लेहेंगा माझ्यासाठी खास गाणे आहे. या आवृत्तीसाठी जॉन सर आणि दिव्या मॅम यांच्यासोबत स्टेज शेअर केल्याने ते आणखी खास झाले आहे. या संधीसाठी निर्माते आणि दिग्दर्शक मिलाप सरांचे आभार."

भूषण कुमार, कृष्ण कुमार (टी-सिरीज), मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी, निखिल अडवाणी (एमे एंटरटेनमेंट) निर्मित ‘सत्यमेव जयते २’ गुरुवार, २५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होईल.

हेही वाचा - Actress Khushbhu Tawade: खुशबू तावडेने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; खुशबू संम्राम समेळला पुत्ररत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.