ETV Bharat / sitara

कंगना रणौतविरोधात गीतकार जावेद अख्तर यांचा मानहानीचा दावा - कंगणा राणौत

गेल्या काही दिवसांपासून कंगनाने काही वाहिन्यांवर जावेद अख्तर यांच्या विरोधात वक्तव्य करत ऋतिक रोशन संदर्भात माझ्यावर जावेद अख्तर हे दबाव आणत असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात जावेद अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे. त्यांनी कंगनाविरोधात मानहानीचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे.

Kangana ranaut
कंगणा राणौत
author img

By

Published : Nov 3, 2020, 9:41 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत आता आणखी वाढ झालेली आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना रणौत विरोधात मानहानीचा दावा मुंबईतील अंधेरी न्यायालयामध्ये केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगनाने काही वाहिन्यांवर जावेद अख्तर यांच्या विरोधात वक्तव्य करत ऋतिक रोशन संदर्भात माझ्यावर जावेद अख्तर हे दबाव आणत असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात जावेद अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे. त्यांनी कंगनाविरोधात मानहानीचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण-
कंगनाने तिच्या आरोपात म्हटले आहे की एका वर्षापूर्वी जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला होता की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसं तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्याय सुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कंगना रणौतने केला आहे.

कंगणाच्या बहिणीने सोशल माध्यमांवर जावेद अख्तर यांच्यावर केले आरोप-
जावेद अख्तर हे ऋतिक रोशन संदर्भात काही गोष्टी सांगत असताना सतत माझ्यावर ओरडत होते. त्यामुळे मी फार घाबरले होते असेही कंगनाने तिच्या एका मुलाखतीत म्हटले आहे. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल माध्यम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.