ETV Bharat / sitara

श्रीदेवीच्या पुण्यतिथीनिमित्त जान्हवी आणि खूशीने केले आईचे स्मरण - खूशी कपूर

दिवंगत ज्येष्ठ स्टार श्रीदेवी यांच्या तिसर्‍या पुण्यतिथीनिमित्त तिची अभिनेत्री-मुलगी जान्हवी कपूर म्हणाली की तिला आईची खूप आठवण येते. श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूरने तिच्या आई-वडिलांचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

Janhvi, Khushi
दिवंगत ज्येष्ठ स्टार श्रीदेवी
author img

By

Published : Feb 24, 2021, 7:16 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर आणि तिची धाकटी बहीण खुशी कपूर यांनी बुधवारी सोशल मीडियावर आपल्या दिवंगत आई आणि आयकॉनिक अभिनेत्री श्रीदेवीला तिच्या तिसर्‍या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली.

जान्हवीने आपल्या दिवंगत आईचे स्मरण केले. जान्हवीने इन्स्टाग्रामवर श्रीदेवीने जान्हवीसाठी लिहिलेली एक चिठ्ठी शेअर केली. त्यात लिहिलेले होते, "आय लव यू माय लब्बू. तू जगातील सर्वोत्कृष्ट बाळ आहेस."

Janhvi, Khushi
जान्हवीसाठी लिहिलेले श्रीदेवीचे पत्र

खुशी कपूरनेही इन्स्टाग्रामवर तिची आई श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. दोघेही सुट्टीवर असतानाच्या या फोटोला खूशीने कॅप्शन दिलेले नाही.

Janhvi, Khushi
खुशीने शेअर केला आई बाबांचा फोटो

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईच्या एका हॉटेलच्या बाथटबमध्ये चुकून बुडून मृत्यू झाला, त्यामुळे चित्रपटसृष्टी, तिचे कुटुंब आणि चाहत्यांना मोठा धक्का सहन करावा लागला होता.

श्रीदेवीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केवळ चार वर्षांची असताना केली. त्याचबरोबर हिंदी, तामिळ आणि तेलगू चित्रपटातील प्रथम क्रमांकाची स्टार बनली. देशाच्या कला आणि चित्रपटसृष्टीतल्या तिच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल तिला राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री देऊन गौरविण्यात आले.

हेही पाहा आणि वाचा - तिसर्‍या पुण्यतिथीनिमित्त आठवण श्रीदेवीची

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.