ETV Bharat / sitara

जान्हवी कपूरच्या टीमवर 'उचलबांगडी' करण्याचा प्रसंग, मजेशीर व्हिडिओ व्हायरल - जान्हवी कपूरचा व्हॅनिटी व्हिडिओ

'रुही' चित्रपटासाठी जोरदार प्रचार केल्यानंतर जान्हवी कपूर थकली आहे. सध्या ती पंजाबमध्ये 'गुड लक जेरी' या चित्रपटाचे शुटिंग करीत आहे. शूटसाठी तयार होण्यास ती किती नाखूष आहे हे सांगत जान्हवीने इन्स्टाग्रामवर एक मजेदार क्लिप टाकली आहे. ज्यामध्ये तिच्या टीमने तिला उचलून मेकअप चेअरमध्ये बससवल्याचे दिसते.

Janhvi Kapoor
जान्हवी कपूर
author img

By

Published : Mar 16, 2021, 12:22 PM IST

मुंबई - अभिनेत्री जान्हवी कपूरच्या टीममध्ये मजा मस्ती करणाऱ्यांचा मोठा भरणा आहे. सोशल मीडियावरील तिचा एक व्हिडिओ चांगलाच गाजतोय. यात ती शुटूंगला कंटाळल्यामुळे विश्रांती घेत आहे. तिच्या टीमचे लोक तिला ओढून शुटला घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र ती यायला तयार नाही. अखेरीस तिच्या टीमच्या लोकांनी तिची चक्क उचलबांगडी केली आणि शुटिंगसाठी तयार केल्याचा हा व्हिडिओ आहे.

जान्हवी कपूरचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

नवा आठवडा सुरू झाल्यांतर जान्हवीने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर दोन व्हिडिओ शेअर केले. यात ती आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कंटाळून झोपल्याचे दिसते. तिच्या टीममधील सहकारी शीतल एफ खान तिला उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करते. तेव्हा बाकीच्या टीमने तिला उचलून व्हॅनिटीतील मेकअप चेअरवर नेऊन बसवले.

जान्हवी कपूर सध्या पंजाबमध्ये 'गुड लक जेरी' या चित्रपटाचे शुटिंग करीत आहे. सिध्दार्थ सेन गुप्ता दिग्दर्शन ककीत असलेल्या या चित्रपटाचे लेखन पंकज माट्टा यांनी केले आहे. या चित्रपटात दीपक डोब्रियल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. 2019 मध्ये रिलीज झालेल्या मल्याळम थ्रिलर 'हेलन' च्या हिंदी रिमेकमध्येही जान्हवी काम करीत असल्याची चर्चा आहे. मथुकुट्टी झेव्हियर दिग्दर्शित या चित्रपटात सनी कौशल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा - बर्थ डे स्पेशल : जान्हवी कपूरच्या फॅशन मोमेंट्सचा एक झलक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.