मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जॅकलिनचे आई-वडील बहरीनमध्ये राहतात. जॅकलीन सध्या तिच्या कामानिमित्त मुंबईत आहे. मात्र, जॅकलीनला तिच्या आजारी आईला भेटायला जाता येईल की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. कारण ईडीने तिला देश सोडण्यास बंदी घातली आहे.
![फोटो- जॅकलिन फर्नांडिसच्या इन्स्टाग्रामच्या सौजन्याने](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14096090_jq1.jpg)
विशेष म्हणजे जॅकलीनला कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करायला जायचे होते. पण ईडीने तिला परवानगी दिली नाही. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलिनचे संबंध ईडीच्या तपासात समोर आले आहेत. याप्रकरणी जॅकलिनची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीही केली आहे.
![फोटो- जॅकलिन फर्नांडिसच्या इन्स्टाग्रामच्या सौजन्याने](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14096090_jq12.jpg)
कामाच्या आघाडीवर, जॅकलिन सध्या अक्षय कुमार आणि नुसरत भरुचासोबत 'राम सेतू' चित्रपटात काम करत आहे. याशिवाय तिच्याकडे अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपटही आहे. जॅकलीन लवकरच सलमान खानसोबत 'किक 2'मध्ये काम करणार असल्याचं समजतंय. तसंच ती रणवीर सिंगसोबत रोहित शेट्टीच्या 'सर्कस' चित्रपटातही दिसणार आहे.
हेही वाचा - अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'चे रिलीज अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले