मुंबई - बॉलिवूड स्टार जॅकलिन फर्नांडिजने गुरुवारी मुंबईत गरजूंना अन्नदान करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला भेट दिली. त्या ठिकाणी आलेल्या गरजवंतांना अन्न वाढण्यासाठी तिने मदतही केली.
जॅकलिनने 'यू ओन्ली लाईव्ह वन्स' (योलो) हे फाऊंडेशन सुरू केले आहे. या अंतर्गत कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना प्रोत्साहन देण्याचे काम योलो मार्फत केले जाते. जॅकलिनने असेच समाजपयोगी काम करणाऱ्या रोटी बँक या संस्थेला भेट दिल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे, "मदर टेरेसा एकदा म्हणाल्या होत्या की, 'जेव्हा भुकेल्यांना अन्न दिले जाते तेव्हा शांती सुरू होते.' मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांच्यामार्फत चालवल्या जाणार्या, रोटी बँकला भेट दिल्यानंतर भारावून गेले. रोटी बँकच्या वतीने आजपर्यंत लक्षावधी भुकेल्या लोकांना अन्न पुरवण्यात आले आहे.''
कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेमुळे बर्याच लोकांना संसर्ग झाला आहे आणि कोविड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात सध्या कोविड -१९ च्या नवीन रुग्णांची संख्या ३, ८२, ३१५ इतकी झाली आहे. सध्या सक्रिय रुग्ण संख्या ३४,८७,२२९ वर पोहोचली आहे.
अलिकडेच ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांनी १०० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स दान करुन कोविड -१९ विरुद्धच्या लढाईत आपले योगदान दिले आहे. बीपीएल अंतर्गत व्यक्ती व कुटूंबियांना मोफत ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स दान करण्याच्या उपक्रमात सुनील शेट्टीही सामील झाला आहे. या व्यतिरिक्त आयुष्यमान खुराना आणि त्यांची पत्नी ताहिरा कश्यप यांनी राज्यातील कोविड -१९ साथीच्या आजाराने त्रस्त लोकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मदत निधीत देणगी दिली आहे.
हेही वाचा - "गर्दी टाळा, मास्क परिधान करा आणि लस घ्या" : आरआरआर टीमचे आवाहन