मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस या दिवसात खूप व्यग्र आहे. ती एका सेटवरून दुसर्या सेटवर सातत्याने शूटिंग करत असते. सध्या जॅकलिनकडे चार मोठे चित्रपट आहेत, त्यामुळे २०२१ मध्ये ती बॉक्स ऑफिसवर राज्य करेल अशी अपेक्षा आहे.
'भूत पोलिस' चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसच्या जवळच्या एका सूत्राने म्हटले आहे की, "जॅकलिनने अलीकडे धर्मशालामध्ये 'भूत पोलिस' चे शेड्यूल पूर्ण केले आहे आणि आता रोहित शेट्टी यांच्या 'सर्कस' चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलच्या शूटिंगसाठी ती परतली आहे. ही वेळ त्याच्यासाठी खूप व्यग्रतेची आहे, परंतु खूप मजेदार देखील आहे. "
चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण करण्यासाठी 'भूत पोलिस' टीम हिमाचल प्रदेशात रवाना झाली होती. जॅकलिननेही तिची दिवाळी येथे साजरी केली होती.
हेही वाचा - आपण किती कफल्लक आहोत हे लॉकडाऊनमध्ये समजले - अनुपम खेर
नुकतीच अभिनेत्री जॅकलिनला साजिद नाडियाडवाला यांच्या 'बच्चन पांडे' या चित्रपटासाठीदेखील कास्ट करण्यात आली असून या चित्रपटात ती पुन्हा अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. याशिवाय जॅकलिन सलमान खानसोबत 'किक 2' मध्येही दिसणार आहे.
हेही वाचा - गेल्या आठ महिन्यांपासून काहीच काम मिळालेले नाही - मीका सिंह