ETV Bharat / sitara

जॅकी भगनानी आणि जुनो चोप्रा यांनी उचलला 'द बर्निंग ट्रेन' पुन्हा बनवण्याचा विडा - Jacky Bhagnani latest news

जॅकी भगनानी आणि जुनो चोप्रा यांनी रवि चोप्रा यांच्या 'द बर्निंग ट्रेन' चित्रपटाचा रिमेक बनवण्याचे ठरवले आहे. १९८० मध्ये आलेला हा मस्टीस्टारर चित्रपट होता.

jacky-bhagnani-and-juno-chopra-
जॅकी भगनानी आणि जुनो चोप्रा
author img

By

Published : Mar 11, 2020, 1:50 PM IST

मुंबई - चार दशकापूर्वी आलेल्या 'द बर्निंग ट्रेन' या अॅक्शन थ्रिलरचा थरार पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अभिनेता जॅकी भगनानी आणि जुनो चोप्रा यांनी बीआर फिल्म्सचा हा चित्रपट पुन्हा बनवण्याचा विडा उचलला आहे.

ही माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर दिली आहे.

तरण यांनी जॅकी आणि जुने यांचा फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''जॅकी भगनानी आणि जुनो चोप्रा यांनी रवि चोप्रा यांच्या १९८० मधील मस्टीस्टारर 'द बर्निंग ट्रेन' चा रिमेक बनवण्यासाठी हात मिळवला आहे. दिग्दर्शक आणि मुख्य कलाकारांची घोषणा लवकरच केली जाईल.... या चित्रपटाचे शूटींग यावर्षीच्या शेवटी सुरू होईल.''

remake the burning train
'द बर्निंग ट्रेन' या अॅक्शन थ्रिलरचा थरार पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर

जुनोचे वडिल रवि चोप्रा आणि बीआर चोप्रा यांनी निर्माण केलेल्या 'द बर्निंग ट्रेन' चित्रपटात धर्मेंद्र, विनोद खन्ना, जितेंद्र, हेमा मालिनी, परवीन बाबी आणि नीतू सिंह यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याचे संगीत आर. डी. बर्मन यांचे होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.