मुंबई - आलिया आणि अनन्या पांडेची मिमिक्री केलेले काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये एका मुलाने मुलीचा ड्रेस घालून मुलीप्रमाणेच लूक केला आहे. या व्हिडिओने केवळ नेटकऱ्यांचे नव्हे तर कलाकारांचेही लक्ष वेधलं आहे. अनन्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
शेअर केलेल्या या व्हिडिओला कॅप्शन देत अनन्या म्हणाली, माझीच भूमिका माझ्यापेक्षा उत्तम निभावली. हा मिमिक्री व्हिडिओ टिक टॉक स्टार रोनित अशरा याने आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओला 3 लाख 50 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
कलाकारांप्रमाणे लूक करुन त्यांची मिमिक्री करणाऱ्या अशराने नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत अशराच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. अनेकांनी यावर कमेंट करताना म्हटलं, की अनन्यापेक्षाही उत्तम अभिनय केला. अशरानं अनन्याशिवाय सैफ अली खान आणि इतरही अनेक कलाकारांची मिमिक्री केली आहे.