ETV Bharat / sitara

'छपाक'चं चित्रीकरण पूर्ण, दीपिकानं फोटो शेअर करत दिलं खास कॅप्शन - laxmi agarwal

छपाक असं शीर्षक असलेल्या या चित्रपटात प्रेक्षकांना अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची कथा पाहायला मिळणार आहे. आता या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.

'छपाक'चं चित्रीकरण पूर्ण
author img

By

Published : Jun 5, 2019, 12:23 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण मोठ्या ब्रेकनंतर आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. छपाक असं शीर्षक असलेल्या या चित्रपटात प्रेक्षकांना अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची कथा पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली होती. आता या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. दीपिकानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून संपूर्ण टीमसोबतचा एक फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. माझ्या चित्रपटसृष्टीतील करिअरमधील सर्वात मौल्यवान सिनेमा, असं कॅप्शन देत दीपिकानं ही पोस्ट शेअर केली आहे.

deepika padukone
'छपाक'चं चित्रीकरण पूर्ण

या फोटोसोबतच १० जानेवारी २०२० ला हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं दीपिकानं म्हटलं आहे. या चित्रपटातील लक्ष्मीच्या भूमिकेतील तिचा फर्स्ट लूक २५ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तिच्या या पहिल्या लूकपासूनच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.