ETV Bharat / sitara

'बाफ्टा'च्या 'इन मेमोरियम'मध्ये इरफान खान आणि ऋषी कपूर यांना श्रध्दांजली - Tribute to Irrfan Khan

यंदाच्या बाफ्टा चित्रपट महोत्सवातील 'इन मेमोरियम'मध्ये इरफान खान आणि ऋषी कपूर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. जगभरातील दिग्गजांचे गोल्या वर्षी निधन झाले. यामध्ये प्रिन्स फिलिप, चाडविक बोसमन आणि ख्रिस्तोफर प्लम्मर इत्यादींनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

Irrfan Khan, Rishi Kapoor
इरफान खान आणि ऋषी कपूर
author img

By

Published : Apr 12, 2021, 2:31 PM IST

लंडन - एप्रिल २०२० मध्ये निधन झालेले भारतीय स्टार इरफान खान आणि ऋषी कपूर यांचा सन्मान बाफ्टाच्या 'इन मेमोरियम' या सेगमेंटमध्ये करण्यात आला. यामध्ये प्रिन्स फिलिप, चाडविक बोसमन आणि ख्रिस्तोफर प्लम्मर यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

गेल्या वर्षी गमावलेल्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश ' इन मेमोरियम' सेगमेंटमध्ये करण्यात येतो व त्यांचा सन्मान करण्यात येतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर इरफान खान यांनी आपला लौकिक निर्माण केला होता. २९ एप्रिल २०२० रोजी वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांचे न्यूरोएन्डोक्राइन कर्करोगाने निधन झाले. हा बॉलिवूडसाठी मोठा धक्का होता.

त्यानंतर ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला दुसरा मोठा धक्का बसला. ३० एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी कर्क रोगाने निधन झाले.

प्रिन्स फिलिप, एडिनबर्गचा ड्यूक यांचे ९ एप्रिल, २०२१ रोजी विंडसर कॅसल येथे निधन झाले. यावर्षी बाफ्टा फेस्टीव्हलमध्ये यांच्यासोबत 'इन मेमोरियम' या सेगमेंटमध्ये संगीतकार एन्निओ मॉरिकोन, सीन कॉन्नेरी, जॉर्ज सेगल, दिग्दर्शक बर्ट्रँड टॅव्हर्नियर, बार्बरा जेफर्ड, बेन क्रॉस, इयान होल्म, बार्बरा विंडसर आणि कर्क डग्लस यांचा समावेश होता.

हेही वाचा - कोरोना उद्रेकामुळे कंगना रानौत अभिनित ‘थलायवी’चे सुद्धा प्रदर्शन ढकलले पुढे!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.