मुंबई - बॉलिवूड अभिनता इरफान कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करत बॉलिवूडमध्ये परतला आहे. 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. त्यामुळे, निश्चितच त्याच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट अधिक खास असणार आहे.
काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील इरफानचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. आता यापाठोपाठ चित्रपटाच्या सेटवरील त्याचा आणखी एक फोटो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या उदयपुरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या फोटोत इरफान आपल्या बाईकवर बसलेला दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इरफान खान या फोटोमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक होमी अदजानिया यांच्यासोबत बोलताना दिसत आहे. इरफानचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान 'अंग्रेजी मीडियम' चित्रपट २०१७ मध्ये आलेल्या 'हिंदी मीडियम' चित्रपटाचा सिक्वल असणार आहेत. इरफानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.