मुंबई - बॉलिवूड अभिनेता इरफान खान मागच्याच महिन्यात लंडनहून उपचार घेऊन परतला. भारतात परतल्यानंतर त्याची एक झलक टीपण्यासाठी माध्यमांची नजर त्याच्यावर होतीच. इरफान नेहमीच त्याचा चेहरा झाकून ठेवत असल्यामुळे त्याचा चेहरा समोर आला नव्हता. मात्र, अलिकडेच त्याला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी त्याचा हटके लूक पाहायला मिळाला.
- View this post on Instagram
#irfankhan today at the airport 👍👍👍👍 and he removes the Mask he was seen wearing earlier.
">
इरफान खान लवकरच आगामी 'हिंदी मीडियम' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. कॅन्सरवर उपचार सुरू असताना चाहत्यांना इरफान बरा होऊन कधी भारतात परतणार, याची आतुरता होती. गेल्या वर्षी इरफाननेच त्याला कॅन्सर असल्याची माहिती दिली होती. पुढे लंडन येथे त्याने उपचार घेतले. आता त्याची प्रकृती बरी आहे.
- View this post on Instagram
Looking good sir. So happy 👍👍👍👍 #irfankhan #airportdiaries @viralbhayani
">
इरफानच्या 'हिंदी मीडियम' चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतीसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगले यश मिळविले होते. आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये त्याच्यासोबत करिना कपूर झळकणार आहे. इरफान खानला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.