ETV Bharat / sitara

अमिताभ आणि अजय देवगणसोबत 'मेडे'मध्ये झळकणार यू ट्यूबर कॅरी मिनाटी

'मेडे' या चित्रपटातून यू ट्यूबर कॅरी मिनाटी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटात तो सोशल मीडिया सेन्सेशनची भूमिका साकारणार आहेया चित्रपटात तो अमिताभ बच्चन आणि अजय देवगणसोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे.

author img

By

Published : Dec 18, 2020, 6:59 PM IST

CarryMinati
यू ट्यूबर कॅरी मिनाटी

मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका असेल्या 'मेडे' या चित्रपटातून यू ट्यूबर कॅरी मिनाटी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटात तो सोशल मीडिया सेन्सेशनची भूमिका साकारणार आहे. कॅरीचे खरे नाव अजय नगर आहे. कॅरी म्हणाला, "मी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांसोबत काम करत असल्याचा मला खरोखर आनंद झाला आहे. मी अगदी नवीन- साहसी कामासाठी उत्सुक झालो आहे."

Internet sensation CarryMinati
अजय देवगणसोबत 'मेडे'मध्ये झळकणार यू ट्यूबर कॅरी मिनाटी

तो पुढे म्हणाला, "यापूर्वीही माझ्याकडे बर्‍याच चित्रपटांच्या ऑफर आल्या, पण मी या सिनेमाचा एक भाग होण्याचे कबूल केले आहे. कारण यात मला स्वतःचेच पात्र साकारायचे आहे, जो मी खऱ्या आयुष्यात आहे. मला आठवते जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या आईवडीलांना नेहमी वाटायचे की मी एक अभिनेता होईन. तुम्ही पाहात आहात की अभिनय असा आहे की जो मला स्वाभाविकपणे संगीतासारखा येतो. त्यामुळे वास्तविक हे माझ्यासाठी काही रॉकेट सायन्ससारखे नाही.''

हेही वाचा - 'रश्मी रॉकेट'साठी तापसी पन्नू घेतेय कठोर प्रशिक्षण, नवीन फोटो केले शेअर

'मेडे' या चित्रपटात रकुल प्रीत सिंह, अंगिरा धर आणि आकांक्षा सिंह मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होईल.

हेही वाचा - बिग बॉस : खराब वागणुकीमुळे शोमधून 'हाकलून' देण्यात आलेले स्पर्धक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.