मुंबई ( महाराष्ट्र ) - दिग्गज फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी गुरुवारी रात्री दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि इतरांसह विविध बी-टाउन सेलिब्रिटीजसह एक गेट-टूगेदर आयोजित केला होता. या डिनर पार्टीमध्ये दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, धैर्य करवा आणि दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्यासह गहराइयाँ टीमने हजेरी लावली होती.

या पार्टीत अनन्याचा कथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता इशान खट्टरही उपस्थित होता. मनीषने अभिनेता सारा अली खान, जान्हवी कपूर आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यासोबतचा एक ग्रुप फोटो शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी मनीष मल्होत्राने सोशल मीडियावर करण जोहरसह करीना कपूर खान आणि अरोरा बहिणी, मलायका आणि अमृता यांच्यासोबत आणखी एका गेट-टूगेदरची झलक शेअर केली होती.

दरम्यान, गहराइयाँची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतलेली आहे कारण रिलीजची तारीख जवळ येत आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित गहराइयाँ चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य करवा, नसिरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
गहराइयाँ चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 11 फेब्रुवारी 2022 रोजी जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर होणार आहे.
हेही वाचा - सामंथा नागा चैतन्य घटस्फोटाच्या बातम्यांबद्दल नागार्जुनाने मीडियाला फटकारले