ETV Bharat / sitara

'बधाई दो'मध्ये पोलिसाची भूमिका करण्यासाठी राजकुमार राव करतोय कठोर मेहनत - 'बधाई दो'मध्ये राजकुमार राव

अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव 'बधाई दो' या चित्रपटात एका पोलिसाची भूमिका करीत आहे. यासाठी तो जीममध्ये प्रचंड मेहनत घेत आहे. भूमी पेडणेकरची भूमिका असलेल्या या चित्रपटाचे शुटिंग २०२१ च्या जानेवारी महिन्यात सुरू होईल.

Rajkumar
राजकुमार राव
author img

By

Published : Dec 15, 2020, 6:00 PM IST

मुंबई - अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव आपल्या चतुरस्त्र अभिनयासाठी ओळखला जातो. आजवर तो विविध भूमिका अक्षरशः जगला आहे. आता तो एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला असून पहिल्यांदाच तो पोलिसाची भूमिका साकारणार आहे. यासाठी तो खूप अंगमेहनत करीत आहे.

राजकुमार राव याने आपल्या इन्स्टाग्रामवर मेहनतीची एक झलक फोटो शेअर करुन दाखवली आहे. पोलिसाच्या व्यक्तीरेखेला शोभेल असे शरिरसोष्ठव तो बनवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे फोटोत दिसते.

rajkummar rao transformation
राजकुमार रावचा बधाई दो लूक

वर्क इन प्रोग्रेस असे म्हणत राजकुमारने लिहिलंय की, ''नवीन व्यक्तीरेखेसाठी नवा लूक मिळवण्यासाठी नवीन शरीर आणि नवी मानसिकता मिळवणे आवश्यक आहे.'' असे म्हणत त्याने 'बधाई दो' चित्रपटासाठी मेहनत करीत असल्याचे लिहिले आहे.

'बधाई दो' हा 'बधाई हो' फ्रेंचायझीचा दुसरा चित्रपट आहे. यात तो दिल्लीतील एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारेल. या चित्रपटात भूमी पेडणेकरचीही भूमिका असून ती यात पीटी टीचरची व्यक्तीरेखा साकाराताना दिसेल.

हेही वाचा - "छोट्याशा प्रेम प्रकरणासाठी कधीपर्यंत रडणार?" : कंगनाचा हृतिकला सवाल

हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित, 'बधाई दो' हा चित्रपट अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी यांनी लिहिला असून २०२१ मध्ये जानेवारीत याचे शुटिंग सुरू होईल.

हेही वाचा - बुद्धीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यावर बनणार बायोपिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.