ETV Bharat / sitara

मी स्टारपुत्र नाही, पण मैत्रीमुळे इंडस्ट्रीत टिकलो : विद्युत जामवाल

author img

By

Published : Jul 24, 2020, 2:56 PM IST

आपल्या जबरदस्त अॅक्शनने प्रेक्षकांना चकित करणारा अभिनेता विद्युत जामवाल हा बोलण्यातही पटाईत आहे. त्याने सध्या तापलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त करताना म्हटलंय की, तो कोण्या स्टारचा मुलगा नाही आणि केवळ मैत्रीमुळे तो या इंडस्ट्रीत टिकला आहे.

Vidyut Jammwal
विद्युत जामवाल

मुंबई - अ‍ॅक्शन स्टार विद्युत जामवाल बॉलीवूडमध्ये कोणीही मैत्री करु शकत नाही, या कल्पनेशी सहमत नाही. तो म्हणतो की तो स्टारचा मुलगा नाही आणि केवळ मैत्रीमुळे इंडस्ट्रीमध्ये टिकला आहे.

"मी इंडस्ट्रीत आलो आहे तेव्हापासून मी हे ऐकले आहे की आपण इंडस्ट्रीमध्ये चांगले मित्र बनवू शकत नाही. माझा यावर विश्वास नाही. मी एक स्टार मुलगा नाही. मी फक्त मैत्रीमुळे इथे टिकलो आहे. एका मित्राने म्हटले की, 'मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, परंतु माझे बजेट नाही', म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभे राहिलो म्हणून लोक खरोखरच माझ्या पाठीशी उभे राहिले, ” असे विद्युतने सांगितले.

विद्युत जामवाल त्याच्या आगामी ‘यारा’ चित्रपटाच्या रिलीजसाठी कंबर कसून सज्ज आहे. अमित साध, केनी बासुमेट्री आणि विजय वर्मा यांच्याबरोबर असलेल्या मैत्रीबद्दल त्याने उघडपणे चर्चा केली.

"मी म्हणू शकतो की हे लोक माझे खूप चांगले मित्र आहेत. जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा त्यात काहीच बनावट वाटणार नाही," तो म्हणाला.

डेहराडूनमध्ये शूटिंग करत असतानाचा विजयबरोबरचा एक क्षण विद्युतने आठवला. "मला आठवते जेव्हा आम्ही बसलो होतो तेव्हा मी त्याला सांगितले होते, 'तू बहूत बढा स्टार बनेगा, लडके (तू खूप मोठा स्टार होशील)', आणि तो हसायला लागला. यारा नंतर त्याने गल्ली बॉयसाठी शूट केले. आणि मला त्याचा अभिमान वाटला, मला बराच काळ असा कोणाचाही अभिमान नव्हता. विजय, अमित साध आणि केनी बासुमेट्रीशी माझी अशी मैत्री आहे. "

हेही वाचा - धमकी देणाऱ्या ट्रोलर्स विरुध्द न्यायालयात जाण्याच्या तयारीत करण जोहर

तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित, 'यारा' हा 'गँग स्टोरी' या फ्रेंच चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक आहे. चित्रपटाची कथा उत्तर भारतात तयार करण्यात आली आहे आणि भारत-नेपाळ सीमेवर काम करणाऱ्या चार मित्रांच्या जीवनातील चढ उतारांची ही कथा आहे.

चार मित्रांच्या जीवनातील ही उत्कट कथा प्रेक्षकांना भारावून टाकणारी आहे. जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटानंतर अशा मैत्री प्रेमाचा चित्रपट आला नव्हता. कारण या चित्रपटातील आम्ही चौघेही चांगले मित्र आहोत. हा चित्रपट ३० जुलै रोडी फ्रेंडशिप डेला झी ५ वर पाहता येणार असल्याचे शेवटी विद्यतने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.