मुंबई - लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिला समुद्र तटाची खूप आठवण येत आहे. इलियानाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. यात ती व्हाइट कट आउट स्विमसूटमध्ये दिसत आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ''मला बीचची आठवण येत आहे.'' प्रसिध्द फोटोग्राफर कोलस्टन जूलियन यालाही तिने टॅग केले आहे. कारण इलियानाचा हा फोटो त्यानेच क्लिक केला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
यासोबतच इन्स्टाग्राम स्टोरीजवर इलियानाने काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत तिच्या हाती वाईनचा ग्लास आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ''स्वतःसाठी थोडासा वेळ.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इलियानाने अलिकडेच समीरा डिक्रुजसोबतचा एक फोटो शेअर केला होता. यात ती तिची गळाभेट घेताना दिसली होती.
कामाचा विचार करता इलियाना लवकरच 'द बिग बुल' या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत दिसेल. अजय देवगणच्या प्रॉडक्शनचा हा चित्रपट आहे. १९९२ मध्ये सुरक्षेच्या क्षेत्रात झालेल्या कथित घोटाळ्याच्या विषयावरील चित्रपट आहे. २३ ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होईल.