ETV Bharat / sitara

टायगरनं नकार दिला असता, तर 'वॉर' बनवणं खूप अवघड होतं - सिद्धार्थ आनंद - हृतिक रोशन

ते म्हणाले, चित्रपटातील हा रोल आणि हृतिकच्या अपोझिट झळकण्यासाठी टायगरहून उत्तम कलाकार मला दिसत नव्हता. त्यामुळे, या सिनेमात हृतिक असूनही टायगरने जर तो नाकारला असता, तर हा चित्रपट मी पुढे बनवू शकलो नसतो

'वॉर'वर सिद्धार्थ आनंदची प्रतिक्रिया
author img

By

Published : Sep 13, 2019, 8:13 AM IST

मुंबई - सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनात बनणार वॉर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे दोन जबरदस्त अॅक्शन स्टार झळकणार आहेत. मात्र, टायगरनं जर होकार दिला नसता तर हा चित्रपट बनवणं आपल्यासाठी खूप अवघड असल्याचं सिद्धार्थ यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, चित्रपटातील हा रोल आणि हृतिकच्या अपोझिट झळकण्यासाठी टायगरहून उत्तम कलाकार मला दिसत नव्हता. त्यामुळे, या सिनेमात हृतिक असूनही टायगरने जर तो नाकारला असता, तर हा चित्रपट मी पुढे बनवू शकलो नसतो

हृतिकनं माझ्यासोबत यााधीही बँग बँग सिनेमात काम केलं आहे. त्यामुळे, या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहितानाही माझ्या डोळ्यांसमोर तोच होता आणि जेव्हा मी त्याला सिनेमाची स्क्रिप्ट दाखवली, ती त्याला खूप आवडली. त्यामुळे त्याच्यासोबत टायगरशिवाय कोणीही हा रोल करु शकत नव्हतं. दरम्यान, हृतिक आणि टायगरची मुख्य भूमिका असलेला हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा येत्या २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

ent marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.