मुंबई - अभिनेता बॉबी देओल म्हणतो की, त्याला अभिनेत्री प्रिती झिंटासोबत पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करायला आवडेल. या दोघांनी 'सोल्जर', 'झूम बराबर झूम' आणि 'हीरोज' यासारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे.
बॉबीने सांगितले की, "मला प्रितीबरोबर काम करायला आवडेल. ती फक्त एक सहकलाकार नाही तर, चांगली मैत्रीण आहे. आमच्या वयानुसार असलेल्या भूमिका करण्याची संधी मिळो, आणि मला खात्री आहे की भविष्यात आम्हाला ही संधी मिळेल.''
अभिनेता बॉबी देओलने अलिकडे बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण केली आहेत.
आपल्या पदार्पणाच्या 'बरसात' चित्रपटाविषयी बॉबी म्हणाला, "त्या दिवसांत जो कोणी स्टार किड पडद्यावर येत, असे त्याच्या प्रतिभेचा कस लागत असे. त्यामुळे जेव्हा बरसात लिहिला जात होता तेव्हा माझ्या व्यक्तीरेखेसाठी अॅक्शन, डान्स आणि इमोशन्स सादर करण्यासाठीच्या सक्षमतेवर लक्ष दिले जात होते. या सगळ्यांचा विचार करुन कथा लिहिण्यात आली होती. विषय तयार व्हायला वेळ लागला, कारण योग्य विषय मिळणे सोपे नाही.''
नव्वदच्या दशकात तो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होता, विशेषत: त्याच्या कुरळ्या लांब केसांमुळे त्याचे खूप कौतुक झाले.
तो म्हणाला, "मला नेहमीच लांब केस आवडत होते. मला असे वाटले नव्हते की, प्रेक्षकांवर त्याचा असा प्रभाव पडेल. असे बरेच कलाकार आहेत ज्यांचे लांब केस आहेत, परंतु काही कारणामुळे बॉबी देओल अजूनही त्याच्या लांब केसांसाठी ओळखला जातो. माझे चाहते मला विचारतात 'तू केस का वाढवत नाहीस?' मी म्हणतो, 'काळ बदललाय.' वेगवेगळ्या भूमिका करायच्या असतात, तेव्हा लांब केस सहाय्यभूत ठरत नाहीत. लहान केस कोणत्याही व्यक्तीरेखेसाठी योग्य ठरतात.''