मुंबई - अभिनेता ताहिर राज भसीन त्याच्या आगामी ‘लूप लपेटा’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यास उत्सुक झाला आहे. तो म्हणतो की त्याच्यासाठी 'रोल साउंड, कॅमेरा आणि अॅक्शन' हे शब्द ऐकणे एखाद्या जादुपेक्षा कमी नाही.
ताहिर म्हणाला, "मी चित्रपटाच्या सेटवर परत आल्याचा मला आनंद झाला आहे. 'रोल साउंड, कॅमेरा आणि अॅक्शन' यासारखे जादू करणारे शब्द ऐकण्यापेक्षा चांगली गोष्ट नाही. स्क्रिप्ट वाचणे आणि इतर तयारी आम्ही काही महिन्यापासून व्हॉट्सअप आणि झूमच्या माध्यामातून केली आहे. परंतु क्रूला भेटणे आणि पहिल्यासारखे वागणे याची तुलना व्हर्चुअल मिटींग्सशी होऊ शकत नाही.''
या चित्रपटात तो तापसी पन्नूसोबत काम करत आहे. ताहिरने सांगितले की, ''शूटिंगच्या पहिल्या दिवशी सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स एकमेकांना भेटण्यासाठी खूप आनंदी आणि उत्साही होते. "लूप लपेटा''च्या सेटवर पहिल्याच दिवशी खळबळ उडाली होती. आम्ही सगळेच शूट करण्यास उत्सुक होतो. सेट्सवर आश्चर्यकारक उर्जा होती. निर्माते तनुज गर्ग आणि अतुल कसबेकर, आमचे नवोदित दिग्दर्शक आकाश भाटिया या सर्व टीमचे उर्जा कमालीची होती. "
हेही वाचा - निक जोनास 'टेक्स्ट फॉर यू' चित्रपटात करणार प्रियंकासोबत भूमिका
सेटवर न्यू नॉर्मलचे सर्व नियम पाळले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वत: चे आणि क्रू टीमचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
तापसीबरोबरच्या आपल्या जोडीबद्दल ताहिर म्हणाला, "तापसीसारख्या को-स्टारबरोबर काम करणे खूप छान आहे. या नव्या लीड जोडीचा प्रभाव विलक्षण असेल. आमची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडेल. आम्ही त्यासाठी खूप मेहनत करत आहोत. मी आणि तापसी जेव्हा सेटवर भेटलो तेव्हा आमच्यात लॉकडाऊनच्या अनुभवांची चर्चा झाली.''
हेही वाचा - अखेर असे वाटायला लागलंय की ही माझी वेळ आहे - पंकज त्रिपाठी