अभिनेत्री हुमा कुरेशी बॉलिवूडप्रमाणेच काही हॉलिवूडच्या चित्रपटांतूनही झळकली आहे. ‘व्हॉईसरॉयज हाऊस’ नंतर आता तिचा ‘आर्मी ऑफ द डेड’ प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत जॅक स्नायडर आणि त्यांच्यासोबत झालेली पहिली भेट हुमाला जशीच्या तशी आठवतेय. "त्यांनी पांढरा शर्ट घातला होता आणि त्याचा कॅमेरा चालू होता आणि मी विचार करत होतो की आता हा पांढरा शर्ट कुठल्याही क्षणी मलीन होईल आणि झालेही तसेच”, हुमा कुरेशीने हॉलिवूड फिल्म ‘आर्मी ऑफ द डेड’ चे दिग्दर्शक जॅक स्नायडरबरोबरच्या आपल्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले.
नुकत्याच एका आभासी ‘जस्टिस कॉन स्पॉटलाइट’ मिटिंगमध्ये ‘आर्मी ऑफ द डेड’ च्या या स्त्री कलाकारासोबत जॅक स्नायडर ने वार्तालाप केला. या आभासी कार्यक्रमात त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आपले काही अनुभव सांगितले. या मजेदार सत्रात ‘झोम्बीज’ च्या जगतात काम करण्यासाठी झॅक स्नायडरच्या अनुभवांवर चर्चा झाली. हुमा आधीपासूनच जॅक स्नायडरची खूप मोठी चाहती आहे व त्याच्याशी गप्पा मारणे हा तुम्हाला अत्यंत वेगळ्या जगात वावरल्याचा अनुभव देतो असे तिने ठासून सांगितले.
लहानपणापासूनच हुमा जॅक स्नायडरचे चित्रपट, कमालीची भिती वाटत असूनही, पाहत असे. ‘एकदा तर घाबरून मी चित्रपटगृहातून धूम ठोकत एका दमात घर गाठले होते’, असे तिने हसत हसत सांगितले. ती पुढे म्हणाली की, ‘अमेरिकत एका दुसऱ्या कामासाठी गेले असता मी सहजच आर्मी ऑफ द डेड ची ऑडिशन दिली आणि कारण होते अर्थातच दिग्दर्शक जॅक स्नायडर. माझे सिलेक्शन झाल्यावर माझ्या स्वप्नांच्या ‘बकेट लिस्ट’ मध्ये एक ‘टिक’ वाढली. खरंतर हा माझा पहिला हॉलिवूडमधील चित्रपट आहे. माझ्यासाठी जॅक स्नायडर सोबत काम करणे म्हणजे स्वप्नपूर्ती होती. साहजिकच मला त्यांच्यासोबत पुन्हा काम करायला नक्कीच आवडेल.’
जॅक स्नायडर दिग्दर्शित ‘आर्मी ऑफ द डेड’ चा ट्रेलर १३ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आला होता आणि हुमा कुरेशीवर अभिनंदनाचा पाऊस पडला होता. या चित्रपटात डेव ब्यूटिस्टा, एला पुर्नेल, ओमरी हार्डविक आणि एना डी ला रेगुएरा यांचादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.
हुमा कुरेशी अभिनित व जॅक स्नायडर दिग्दर्शित ‘आर्मी ऑफ़ द डेड’ येत्या २१ एप्रिलला नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा - पुणे स्थानकाबाहेर परप्रांतीय मजुरांची गर्दी, ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा