मुंबई - बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशन आपली दमदार स्टंट्स, डान्स, अभिनय आणि फिटनेससाठी ओळखला जातो. मात्र त्याचे वडील आणि सुप्रसिध्द दिग्दर्शक राकेश रोशन देखील फिटनेस ची पुरेपूर काळजी घेत असतात. त्यांच्या फिटनेसचा एक व्हिडिओ हृतिकने पोस्ट केला आहे. या व्हिडिओ पोस्ट मध्ये त्याने आपल्या वडिलां ची जिद्द पाहून कोरोनाने देखील घाबरायला हवं, असे लिहलं आहे.
हृतिकने शुक्रवारी राकेश यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला. राकेश यांचे वय सध्या 71 वर्ष इतके आहे. तरीही ते दररोज 2 तास व्यायाम करतात. या व्हिडिओ मध्ये देखील त्यांची व्यायामाप्रती असलेली निष्ठा पाहायला मिळते.
हृतिकने आपल्या पोस्ट मध्ये त्यांच्याबाबत लिहिलं आहे, की 'हे माझे वडील, जे कोणतीही गोष्ट करण्यासाठी हार मानत नाहीत. कोरोना बरोबर लढण्यासाठी देखील अशाच जिद्दीची आणि दृढ संकल्पाची गरज आहे. मागच्या वर्षी माझ्या वडिलांनी कॅन्सर सारख्या आजाराला हरवले आहे. त्यामुळे कोरोनाने माझ्या वडिलांना घाबरायला हवं', असे त्याने लिहिलं आहे.
हृतिकने यापूर्वी देखील एका व्हिडिओद्वारे चाहत्यांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले होते.