ETV Bharat / sitara

पुण्यातील इव्हेन्टपूर्वी ह्रतिक रोशन बनला सबा अझादचा चिअरलिडर - ह्रतिक रोशन गर्लफ्रेंड

हृतिक रोशनने त्याची तथाकथित गर्लफ्रेंड सबा आझादला शुक्रवारी तिच्या पुण्यातील इव्हेन्टपूर्वी प्रोत्साहित केले आहे. सबा आणि अभिनेता इमाद शाह यांचा पुण्यात मॅडबॉय मिंक हा शो आयोजित करण्यात आला होता. या शोचे पोस्टर शेअर करीत ह्रतिकने दोघांनाही शुभेच्छा देत चीयर्स केले.

ह्रतिक रोशन सबा आझाद
ह्रतिक रोशन सबा आझाद
author img

By

Published : Feb 26, 2022, 12:06 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - सुपरस्टार हृतिक रोशनने नुकतीच त्याची तथाकथित गर्लफ्रेंड सबा आझादला शुक्रवारी तिच्या पुण्यातील इव्हेन्टपूर्वी प्रोत्साहित केले आहे. सबा आणि अभिनेता इमाद शाह यांचा पुण्यात मॅडबॉय मिंक हा शो आयोजित करण्यात आला होता. या शोचे पोस्टर शेअर करीत ह्रतिकने दोघांनाही शुभेच्छा देत चीयर्स केले.

ह्रतिकने पोस्ट केलेली इन्स्टा स्टोरी
ह्रतिकने पोस्ट केलेली इन्स्टा स्टोरी

पोस्ट शेअर करताना ह्रतिकने लिहिले, "किल इट यू गाईज," आणि फोटोसोबत सबाच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलला टॅग केले. एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या असताना ह्रतिकने सबासाठी सोशल मीडिया पोस्ट शेअर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. काही दिवसापूर्वी सबा हृतिकच्या कुटुंबात लंचवर सामील झाली होती. हृतिकचे काका आणि संगीतकार राजेश रोशन यांनी गेट-टूगेदरचा एक फोटो शेअर केला होता.

यावेळी शेअर करण्यात आलेल्या फोटोत हृतिक सबासह आणि आई पिंकी रोशन, त्याची मुले ह्रहान आणि हृदान, काका राजेश रोशन यांच्यासह इतर कुटुंबातील सदस्यांसह बसलेला दिसत आहे. अलीकडेच सुझानने मुंबईतील एका कार्यक्रमात सबाच्या अभिनयाचे कौतुकही केले होते. त्यानंतर सबानेही सुझानचे आभार मानले होते. तिने लिहिले, "धन्यवाद सुझी, काल रात्री तू तिथे होतीस म्हणून मला खूप आनंद झाला."

हृतिक रोशन आणि सबा या दोघांना जेव्हा मुंबईच्या रेस्टॉरंटमधून हात धरून बाहेर पडताना पाहण्यात आले त्यानंतर दोघे डेट करीत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. हृतिकचे यापूर्वी सुझान खानशी लग्न झाले होते, त्यांना दोन मुले आहेत. 2014 मध्ये ते वेगळे झाले आहेत.

दरम्यान हृतिक शेवटचा 2019 मध्ये आलेल्या 'वॉर' या चित्रपटामध्ये दिसला होता, तर सबा शेवटची 'रॉकेट बॉईज' या वेब सीरिजमध्ये पिप्सी म्हणून दिसली होती जी सध्या सोनी लिव्हवर स्ट्रीम होत आहे.

हेही वाचा - Chakda Xpress : अनुष्का शर्माची क्रिकेट नेटप्रॅक्टीस, झुलनने दिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.