ETV Bharat / sitara

लॉकडाऊनमध्ये ह्रतिक पियानो वाजवताना, व्हिडिओत मागे दिसली सुझान - ह्रतिक पियाने वाजवताना, व्हिडिओत मागे दिसली सुझान

देशभर लॉकडाऊनच्या काळात विरंगुळा म्हणून प्रत्येकजण काहीना काहीतरी करतोय. ह्रतिक रोशनने आपल्या पियोनावर हात साफ केला. या व्हिडिओमध्ये त्याच्या मागे एक्स वाईफ सुझान दिसत आहे.

Hrithik Roshan shared His piano
ह्रतिक पियाने वाजवताना
author img

By

Published : Apr 1, 2020, 3:59 PM IST

मुंबई - ह्रतिक रोशनची एक्स वाईफ सुझान खान मुलांसह ह्रतिकच्या घरी परतली आहे. लॉकडाऊनच्या काळात मुलांपासून वडिल लांब जाऊ नयेत यासाठी तिने हे पाऊल उचलले आहे. लॉकडाऊनच्या काळात विरंगुळा म्हणून ह्रतिक पियानो वाजवताना दिसत आहे. त्याने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ह्रतिकने आपल्या व्हिडिओच्या पोस्टमध्ये लिहिलंय, ''वेदांतुने दिलेल्या २१ दिवसांच्या चॅलेंजनुसार प्रेरित होऊन मी पियानो शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. डोक्याच्या दोन्ही भागांना सक्रिय करण्यासाठी ही चांगली अॅक्टिव्हिटी आहे. दोन अंगठ्यांमुळे पियानो नीट वाजवू शकत नाही. ''

पियानो वाजवल्यानंतर तो म्हणतो, ''हे उत्तम नाही पण प्रयत्न करीत आहे. मी आत्ताच शिकायला सुरूवात केली आहे. घरी रहा, सुरक्षित रहा.''

व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये सुझान दिसत आहे. तिचा उल्लेख करीत ह्रतिकने लिहिलंय, ''सुझान त्याच्या घराच्या खराब डिझाईनचा सर्व्हे करीत आहे.''

सुझान यावेळी मुंबईतील त्याच्या घरात सुझान आणि मुलांसोबत एकांतात राहात आहे. गेल्या आठवड्यात सुझानच्या सपोर्टबद्दल पोस्ट लिहिली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.