ETV Bharat / sitara

ह्रतिकने सबा आझादला म्हटले 'विलक्षण व्यक्ती', वाचा तिची प्रतिक्रिया - ह्रतिक रोशन आणि सबा आझाद

रविवारी सबाने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती सत्यजित रे यांच्या 'गुपी गाइन बाघा बाइन' या चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे. जेव्हा तिने तिचा गाण्याचा व्हिडिओ शेअर केला तेव्हा अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी तिच्या गायन कौशल्याची प्रशंसा केली. तिच्या गायन कौशल्याने प्रभावित होऊन, हृतिक रोशननेही सबाचे कौतुक केले आहे.

ह्रतिक रोशन आणि सबा आझाद
ह्रतिक रोशन आणि सबा आझाद
author img

By

Published : Mar 7, 2022, 12:12 PM IST

हैदराबाद - बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि सबा आझाद हे जोडपे सध्या खूप चर्चेत असते. काही वेळा एकमेकांसोबत स्पॉट झाल्यानंतर रविवारी सबाने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती सत्यजित रे यांच्या 'गुपी गाइन बाघा बाइन' या चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे. सबा सध्या अस्वस्थ आहे आणि स्वतःला व्यस्त ठेवण्याचे मार्ग शोधत आहे. जेव्हा तिने तिचा गाण्याचा व्हिडिओ शेअर केला तेव्हा अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी तिच्या गायन कौशल्याची प्रशंसा केली.

कथित लेडीलव्हच्या गायन कौशल्याने प्रभावित होऊन, हृतिकने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, "तू एक विलक्षण व्यक्ती आहेस." त्याला उत्तर देताना सबाने लिहिले, "ह्रतिक, तू सर्वात दयाळू आहेस."

सबा आझादची प्रतिक्रिया
सबा आझादची प्रतिक्रिया

हृतिकने सोशल मीडियावर सबाचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच तिच्या पुण्यातील इव्हेन्टपूर्वी ह्रतिकने तिला चियर्स करणारी पोस्ट लिहिली होती.

याआधी सबाला रोशन कुटुंबाने घरी बनवलेले जेवण दिले. याआधीही ती रोशन कुटुंबासोबत लंचसाठी सामील झाली होती. हृतिकचे काका, राजेश रोशन यांनी इंस्टाग्रामवर कौटुंबिक फोटो शेअर केला होता ज्यात सबा आझाद हृतिकची आई पिंकी रोशन, त्याची मुले हृहान आणि हृदान यांच्यासह कुटुंबातील सदस्यांसह दिसत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर हृतिक दीपिका पदुकोणसोबत 'फायटर'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 26 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात येणार आहे. त्याच्या हातामध्ये 'विक्रम वेधा' देखील आहे.

हेही वाचा - वरुण सूदपासून वेगळे झाल्याची दिव्या अग्रवालने केली घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.