ETV Bharat / sitara

Hrithik Roshan Birthday : हृतिक रोशनच्या या आजारापुढे डॉक्टरांनीही टेकले होते हात

हृतिक रोशन सोमवारी त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे वयाच्या २१व्या वर्षी हृतिक रोशनच्या या गंभीर आजारासमोर डॉक्टरांनीही हात वर केले होते.

हृतिक रोशन
हृतिक रोशन
author img

By

Published : Jan 10, 2022, 1:49 PM IST

मुंबई - 'ग्रीक गॉड' या नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा पहिला सुपरहिरो हृतिक रोशनचा सोमवारी (10 जानेवारी) 48 वा वाढदिवस आहे. हृतिक रोशन हा चित्रपटसृष्टीतील सर्वात मेहनती व सुंदर अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिकच्या सेक्सी लूकसमोर बॉलिवूड आणि हॉलिवूडचे कलाकार टिकत नाहीत. हृतिककडे दमदार अभिनय आणि उत्कृष्ट नृत्य कौशल्य आहे. एक काळ असा होता की हृतिकला एका आजाराने घेरले होते आणि त्याच्या आजारासमोर डॉक्टरांनीही हात टेकले होते. हृतिकच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्याशी संबंधित काही खास आणि मनोरंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

हृतिक रोशनचा पदार्पणात धमाका

हृतिक रोशन
हृतिक रोशन

हृतिक रोशनने 'कहो ना प्यार है' (2000) या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले. हृतिकचा हा 'कहो ना प्यार है' पहिला चित्रपट 21व्या शतकाच्या सुरुवातीला मेगाब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. हृतिक रोशन त्याच्या पहिल्याच चित्रपटापासून जगभर प्रसिद्ध झाला. या चित्रपटात हृतिकने आपल्या दुसऱ्या भूमिकेत डान्स आणि स्टाइलने जे काही निर्माण केले त्याला चाहते आजही विसरलेले नाहीत.

बालकलाकार हृतिक रोशन

हृतिक रोशन
हृतिक रोशन

हृतिक रोशनबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे की तो बालकलाकार देखील होता. हृतिक हा चित्रपट पार्श्वभूमी असलेला आहे, त्यामुळे त्याने लहानपणापासूनच आपल्या अभिनयात सुधारणा करण्यास सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशनचे आजोबा ओम प्रकाश रोशन यांनी त्याला 'आशा' चित्रपटात बालकलाकार म्हणून त्याला संधी दिली होती. या चित्रपटासाठी हृतिकला १०० रुपये फी मिळाली होती.

सेटवर झाडू मारण्यापासून चहा बनवण्याची कामेही करायचा ह्रतिक

हृतिक रोशन
हृतिक रोशन

हृतिक रोशनला नृत्याचे कौशल्य लहानपणापासूनच अवगत होते. त्याने सुरुवातीपासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. तो वडिलांकडे सहाय्यक म्हणून काम करत असे. दरम्यान, हृतिकने अनेकदा सेटवर झाडूही लावला आहे आणि चहा बनवण्यासारखे कामही केले आहे.

ह्रतिकला आले होते लग्नाचे ३० हजार प्रस्ताव

हृतिक रोशन
हृतिक रोशन

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'कहो ना प्यार है' चित्रपटानंतर मुली हृतिकसाठी वेड्या झाल्या होत्या. 2000 साली व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्यांच्या घरी लग्नाचे 30 हजार प्रस्ताव आले होते. हृतिक सध्या घटस्फोटित जीवन जगत आहे.

स्वतःच्या कमजोरीवर केली मात

हृतिक रोशन
हृतिक रोशन

हृतिक रोशनला सुरुवातीच्या काळात स्टॅमरिंगची समस्या होती. या समस्येवर मात करण्यासाठी त्याने स्पीच थेरपी केली. हृतिकही खूप सडपातळ होता, यासाठी त्याने जिममध्ये खूप घाम गाळला. यानंतर त्याने आपले नृत्य कौशल्य परिपूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.

डॉक्टरांनी टेकले होते हात

हृतिक रोशन
हृतिक रोशन

मीडियानुसार, वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी हृतिक रोशनला स्कोलियोसिस नावाच्या आजाराने ग्रासले होते. या आजारात पाठीच्या कण्याला इजा होऊन ती एस आकाराची होऊ लागते. या अवस्थेत हृतिकला डॉक्टरांनी अभिनयापासून दूर राहावे, अन्यथा त्याचे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, असे सांगितले होते. परंतु हृतिकने तब्येतीसाठी केलेल्या मेहनतीने स्वत:ला सावरले आणि डॉक्टरांना चुकीचे सिद्ध केले.

स्वतः करतो स्टंट

हृतिक रोशन
हृतिक रोशन

हृतिकच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि स्टाईलचे अनेक चाहते आहेत. त्याचे चित्रपटांमध्ये दिसणे ही चाहत्यांसाठी मोठी गोष्ट आहे. अभिनयात तर तो निपुण आहे. त्याचबरोबर चित्रपटांमध्ये त्याच्या अॅक्शन आणि स्टंटची चर्चा असते, त्यामुळे ते करण्यात हृतिकही मागे हटत नाही. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटात हृतिकने खतरनाक स्टंट केले होते.

हेही वाचा - Vikram Vedha:हृतिक रोशनने चाहत्यांना दिली वाढदिवसाची भेट, 'वेधा'चा फर्स्ट लूक शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.