मुंबई - वायकॉम - 18 स्टुडिओने गुरुवारी जाहीर केले की त्यांचा आगामी हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनीत चित्रपट 'फायटर' हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी चित्रपटगृहात दाखल होईल. प्रॉडक्शन बॅनरने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर चित्रपटाची नवीन रिलीज तारीख शेअर केली आहे.
"28 सप्टेंबर, 2023 रोजी थिएटरमध्ये भारतातील पहिल्या एरियल अॅक्शन फ्रँचायझी 'फायटर'चे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा," असे वायकॉम - 18च्या ट्विटरवरुन जाहीर करण्यात आले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सिद्धार्थ आनंद-दिग्दर्शित फायटर हा चित्रपट देशातील पहिला एरियल अॅक्शन फ्रँचायझी म्हणून ओळखला जातो आहे. या चित्रपटातून "भारतीय सशस्त्र दलांचे शौर्य, बलिदान आणि देशभक्ती" यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
चित्रपटाच्या नवीन रिलीजच्या तारखेच्या घोषणेसह निर्मात्यांनी शाहरुख खानच्या पठाणसोबतचा संघर्ष टाळला आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाच्या थिएटर रिलीजच्या एक दिवस अगोदर 26 जानेवारी 2023 रोजी फायटर सिनेमागृहात येणार होता. योगायोगाने पठाण चित्रपटाचेही दिग्दर्शन देखील सिध्दार्थ आनंद करत आहे आणि त्यात शाहरुख खानसह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत आहेत.
फायटर चित्रपटात अनिल कपूरचीही भूमिका असून "बँग बँग" (2014) आणि वॉर (2019) सारख्या दोन अॅक्शन ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांनंतर सिध्दार्थ आनंद आणि ह्रतिक रोशन 'फायटर'मध्ये तिसऱ्यांदा एकत्र काम करीत आहेत.
हेही वाचा - सिद्धार्थ आनंदला 'पठाण' चित्रपटाचे दडपण