हैदराबाद : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Bollywood actress Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांनी आतापर्यंत एकाही चित्रपटात सोबत काम केलेले नाही. तरीही या दोघांमध्ये मैत्री झाली आणि हीच मैत्री हळू-हळू प्रेमात रूपांतरित झाली. दरम्यान, काल रविवारी तिने विकी कौशलच्या घरी भेट दिली. यावेळी तिने त्याच्या कुटुंबीयांसोबत चर्चाही केली.
विकीचे प्रयत्न वाया गेले नाही
विकीचा कॅटरिनावर पूर्वीपासून जास्तच क्रश होता. विकीने अनेक टीव्ही शोमधून कॅटरिनासमोर अडखळत-अडखळत आपल्या मनाातील भावना व्यक्त करण्याचा प्रयत्नही केला होता. विकीचा हा प्रयत्न यशस्वी ठरला आणि अखेर बॉलिवूडची ही 'चिकनी चमेली' त्याची झाली.
जेव्हा कॅटरिनाचं ऐकून बेशुद्ध झाला होता विकी
मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा करण जोहरच्या (Karan Johar) शो मध्ये विकी कौशलला हे समजलं की कॅटरिना कैफ त्याच्यासोबत चित्रपट करू इच्छित आहे तर त्यावेळी त्याला यावर विश्वासच बसला नाही आणि हे ऐकून तो बेशुद्ध झाला होता. विकीलाही बऱ्याचदा हे लक्षात आलं की कॅटरिनाच्या हृदयात त्याच्यासाठी थोडी-थोडी जागा बनत आहे.
विकीने दाखवली हिम्मत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अखेर तो दिवसही आला त्यादिवशी विकी कौशलने ठरवलं की तो आता उशीर करणार नाही आणि कॅटरिनाला त्याच्या हृदयातील गोष्ट स्पष्टपणे सांगून टाकेल. विकीने रोमँटिक मूडमध्ये कॅटरिनाला प्रपोज (Vicky proposes to Katrina in a romantic mood) करण्याचं ठरवून थेट कॅटरिनाचे घर गाठले. त्याने कॅटरिनाला प्रपोज करण्याआधी तिची आवड आणि आवडत नसलेल्या गोष्टींची माहिती करून घेतली होती.
असे केले होते प्रपोज
विकीने कॅटरिनाचे अत्यंत आवडते असे डार्क ब्राऊन चॉकलेट (Dark Brown Chocolate) तयार करून घेतले आणि ते घेऊन थेट कॅटरिनाजवळ गेला. या प्रपोज गिफ्टमध्ये त्याने प्रेमाचा प्रस्ताव असलेली नोट तसेच प्रेमाची पहिली निशाणी असलेली अंगठीही (Wedding Ring) ठेवलेली होती. हे सर्व पाहून कॅटरिनाच्या तोंडातून नाही शब्दच आला नाही. तिला विकीमध्ये एका चांगल्या पतीचे गुण दिसले आणि तिने लगेचच त्यांच्यातील या नव्या नात्याला होकार दर्शविला.
हेही वाचा : विकी-कॅटरिनाच्या विवाहस्थळावर स्वयंसेवक तैनात, राजवाडा स्टाईलची भव्य सजावट