ETV Bharat / sitara

'एक्स स्टुडंट' आलिया भट्टसोबत टायगर लगावणार ठुमके - student of the year 2

आलियाचा या गाण्यातील फर्स्ट लूक शेअर करत तिच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळत असल्याने खूप आनंदी असल्याचे टायगरने म्हटले आहे

आलिया भट्टसोबत टायगर लगावणार ठुमके
author img

By

Published : Apr 28, 2019, 10:03 AM IST

मुंबई - अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच 'स्टुडंट ऑफ द ईअर २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबतच अनन्या पांडे आणि तारा सुतारियादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर आता टायगरने एक फोटो शेअर करत आलियादेखील चित्रपटात झळकणार असल्याचे सांगितले आहे.

या चित्रपटातील एका गाण्यात आलिया टायगरसोबत ठुमके लगावताना दिसणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात वरूण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यामुळे आता याच एक्स स्टुडंट आलियाची झलक प्रेक्षकांना या सिक्वलमधूनही पाहायला मिळणार आहे.

आलियाचा या गाण्यातील फर्स्ट लूक शेअर करत तिच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळत असल्याने खूप आनंदी असल्याचे टायगरने म्हटले आहे. यासोबतच तिच्यासोबतचा कामाचा अनुभवदेखील 'खूप छान असल्याचे त्याने सांगितले आहे. दरम्यान मे महिन्यात १० तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.